मुंबई : दसरा मेळाव्यासाठी दादरचे शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या गटाकडून जोरदार मोर्चेबंधणी सुरू असून शिवसेना – शिंदे गटातील तणावाचे वातावरण, प्रभादेवीमध्ये उभय गटांमध्ये झालेला वाद या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्याच्या आयोजनासाठी नेमकी कोणाला परवानगी द्यायची असा पेच मुंबई महानगरपालिकेसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या जी-उत्तर विभाग कार्यालयाने याबाबत विधी खात्याकडून अभिप्राय मागविला आहे. मात्र एकूण परिस्थिती आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता यंदा शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी कोणालाच परवानगी मिळणार नाही, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. परिणामी, यंदा दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्क मैदान सुनेसुने राहण्याची चिन्हे आहेत.

गेली अनेक वर्षे शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेतर्फे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. पूर्वी दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पश्चात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी ठिकठिकाणांहून मोठ्या संख्येने शिवसैनिक शिवाजी पार्क मैदानावर येत होते. काही महिन्यांपूर्वी शिवसनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार गडगडले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर सातत्याने शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या गटाकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत.

martyred soldier shubham ghadge cremated news in marathi
सातारा : शहीद शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Two arrested in conspiracy to murder Ambernath MLA Dr Balaji Kinikar thane news
शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट ? अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कटात दोघे अटकेत
sixth floor of mantralaya likely to close for visitors
मंत्रालयातील सहावा मजला अभ्यागतांसाठी बंद?
Eight Bangladeshis detained and arrested by Anti Terrorist Squad and Thane Crime Investigation Branch on Sunday
दहशतवादी विरोधी पथक आणि ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची भिवंडीत कारवाई, भिवंडीतून आठ बांगलादेशी अटकेत
Sessions Judge of Kalyan District accused threw slippers on judge
कल्याण न्यायालयात आरोपीने, न्यायाधिशांचे दिशेने चप्पल भिरकावली
Deputy Chief Minister Eknath Shinde on a tour of Dare village
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे दौऱ्यावर
Mahabaleshwar Revenue takes strict action against unlicensed mining satara news
विनापरवाना उत्खननावर महाबळेश्वर महसूलची धडक कारवाई

हेही वाचा… “मी देवेंद्र फडणवीसांच्या जागी असतो तर…”, शिंदे गटावर टीका करताना आदित्य ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांना टोला!

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेच्या जी-उत्तर विभाग कार्यालयाकडे अर्ज सादर केला आहे. मात्र शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनीही याच कारणासाठी अर्ज करून शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली आहे. यावरून उभयतांमध्ये सध्या शीतयुद्ध सुरू आहे. ही बाब लक्षात घेऊन जी-उत्तर विभाग कार्यालयाने या संदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या विधी खात्याकडून अभिप्राय मागविला आहे. अद्याप विधी खात्याने आपला अभिप्राय कळवलेला नाही.

हेही वाचा… “महाविकास आघाडीने दीड वर्ष…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वेदान्तवरून आरोप; म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी मोठे…”

जागतिक अभियंता दिनानिमित्त मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांसाठी रवींद्र नाट्य मंदिरमध्ये गुरुवारी रात्री एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बंडखोर खासदार राहुल शेवाळे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल आदी मान्यवर उपस्थित होते. शिंदे, शेवाळे आणि चहल यांच्या भेटीनंतर शिवाजी पार्कच्या आरक्षणाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा… शिवसेना-काँग्रेसवर टीका करताना शिंदे समर्थक आमदाराची जीभ घसरली; वादग्रस्त विधानात म्हटलं, “वीरो के दुश्मन होते है, शेरों…”

दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान कोणाला द्यायचे याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यातच प्रभादेवी परिसरात बंडखोर आमदार सदा सरवणकर आणि शिवसेनेचे महेश सावंत यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. एकूण परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, शिवसेना अथवा बंडखोर आमदारांना शिवाजी पार्क मैदानात मेळाव्याचे आयोजन करण्यास मुंबई महानगरपालिकेकडून परवानगी नाकारण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा… विधान परिषदेवरील १२ आमदारांची नियुक्ती कधी ?

बंडखोर आमदारांच्या गटाने वांद्रे-कुर्ला संकुलातील मोठे मैदान दसरा मेळाव्यासाठी आरक्षित केले आहे. तसेच वांद्रे-कुर्ला संकुलातील अन्य मैदान आरक्षित करण्यासाठी शिवसेनेने अर्ज केला होता. मात्र एमएमआरडीएने परवानगी नाकारली आहे, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत दसरा मेळाव्याचे शिवाजी पार्क मैदानातच आयोजन करायचेल, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. उभयतांमधील वाद विकोपाला जाऊ लागल्याने यंदा शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यास कोणालाच परवानगी मिळण्याची शक्यता नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेचा निर्णय विधी खात्याच्या अभिप्रायावर अवलंबून आहे.

Story img Loader