मुंबई : मुंबईतील सोमय्या शाळेच्या मुख्याध्यापिका परवीन शेख यांनी पॅलेस्टाईन आणि हमास यांच्याबद्दल सहानुभूती दाखवणाऱ्या व समर्थनार्थ आशय असलेल्या पोस्टवर लाईक आणि कमेंट करीत आपली मते मांडली होती. यानंतर सोमय्या शाळेच्या व्यवस्थापनाकडून मुख्याध्यापिका परवीन शेख यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचा प्रकार समोर आला होता. आता सोमय्या शाळेच्या व्यवस्थापनाकडून मुख्याध्यापिका परवीन शेख यांना लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, ‘मुख्याध्यापिका परवीन शेख यांच्याबाबत सोमय्या शाळा व्यवस्थापनाकडून चौकशीची प्रक्रिया सुरु आहे. या प्रकरणाबाबत आता परवीन शेख यांना लेखी खुलासा सादर करण्यास सांगितले आहे. आम्ही त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत’, असे सोमय्या शाळेच्या व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले. सोमय्या शाळा व्यवस्थापनाच्या आदेशानुसार परवीन शेख या लेखी खुलासा सादर करीत आपली बाजू स्पष्ट करणार आहेत.

हेही वाचा – भाडेपट्ट्यात सवलत न दिल्याने म्हाडावासीयांवर आर्थिक बोजा!

हेही वाचा – दिग्गजांच्या नजरेतून ‘ती’च्या भूमिकांचा वेध; ‘लोकसत्ता’च्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाच्या प्रवेशिका उपलब्ध

परवीन शेख यांनी समाजमाध्यमावर पॅलेस्टाईन – इस्त्रायल संघर्षासंदर्भात पोस्ट करीत आपली मते मांडली होती. यासंदर्भातील वृत्त २४ एप्रिल रोजी एका संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने परवीन शेख यांना चौकशीसाठी बोलाविले. २६ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत शाळा व्यवस्थापनाने परवीन शेख यांना राजीनामा देण्यास सांगितले. त्यानंतरही काही दिवस त्यांनी काम करणे सुरू ठेवले. दरम्यान, परवीन शेख या आपल्या पदाचा राजीनामा न देण्यावर ठाम आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Post regarding palestine israel conflict order to submit written disclosure to principal order from somaiya school management mumbai print news ssb