पोस्टमनला मारहाण केल्याप्रकरणी अंबरनाथ येथील नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी अंबरनाथ शहरातील जुना भेंडीपाडा विभागात पोस्टमन राम फराड (४५) हे टपाल वितरणासाठी गेले असता त्यांच्या अंगावर कुत्रा धावून गेला. राम फराड यांनी आजूबाजूला हा कुत्रा कुणाचा अशी विचारपूस केली. त्याचा अपक्ष नगरसेवक याकूब सय्यद यांना राग आला. त्यांनी शिवीगाळ करीत त्यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Story img Loader