मुंबई : मुंबईत पाऊस सुरू होऊन आठ दहा दिवस झाल्यानंतर लगेचच खड्डे अवतरू लागले असून खड्ड्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. गेल्या १० दिवसांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या विविध यंत्रणांकडे १४६ तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी ८३ खड्डे बुजवण्यात आले आहेत. सर्वाधिक तक्रारी मालाड व बोरिवलीमधील असल्याचे निदर्शनास आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडतात व त्यामुळे महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागते. मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी रस्ते विभागाने यंदा तब्बल सहा हजार कोटी रुपयांची कामे हाती घेतली आहेत. मात्र ही कामे पूर्ण होण्यास दोन वर्षे लागणार आहेत. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने रस्त्यांवरील खड्डे व खडबडीत पट्टे बुजवण्यासाठी वेगवेगळी अनेक कंत्राटे दिली आहेत. त्यामुळे यंदा खड्डे बुजविण्याच्या कामासाठी अनेक कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली असून विविध तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. गेल्यावर्षी खड्डे बुजविण्यासाठी शीतमिश्रणाचे कंत्राट दोन वर्षांकरीता देण्यात आले होते. ते यंदाही लागू असताना आणखी नवीन कंत्राटे देण्यात आली आहेत.

हेही वाचा – मध्य रेल्वेने मालवाहतुकीतून कमावले २,३५४ कोटी रुपये

रस्त्यांची कामे सुरू असलेल्या ठिकाणी पडणारे खड्डे संबंधित कंत्राटदारांनी बुजविणे अपेक्षित आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी प्रतिक्रियाशील डांबर आणि रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिट या दोन नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. मात्र पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून डांबरी रस्त्यांवरील खडबडीत पट्टे, तसेच हमी कालावधीत नसलेल्या रस्त्यावरील खडखडीत पट्टे मास्टीक अस्फाल्टने बुजवण्यात आले आहेत. यावर्षी खड्डे बुजवण्यासाठी महानगरपालिकेने सुमारे दीडशे कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च केला आहे. पावसाळापूर्व खडबडीत पट्टी बुजवण्यासाठी १०० कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे यंदा रस्त्यांवर किती खड्डे पडतात याकडे सगळ्याचेच लक्ष लागले आहे. तसेच यंदा खड्ड्यांच्या तक्रारींसाठी महानगरपालिकेने विविध यंत्रणा उपलब्ध केल्या असून प्रत्येक प्रभागासाठी एक तक्रार क्रमांक दिला आहे. या सगळ्या ठिकाणी मिळून १४६ तक्रारी आल्या आहेत.

हेही वाचा – मुंबई : कमी प्रतिसादामुळे विस्टाडोम डबा हटविला

मुंबईतील सहा मीटर आणि त्यापेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी महानगरपालिकेच्या परिरक्षण खात्यामार्फत शीतमिश्रणाचा वापर करण्यात येणार आहे. मुंबईतील सर्व विभागांत खड्डे बुजवण्यासाठी आतापर्यंत १३०० मेट्रिक टन शीतमिश्रण पुरवण्यात आले आहे. तर २०० मेट्रिक टन शीतमिश्रण राखीव ठेवण्यात आले आहे.