कल्याण डोंबिवली पालिका मुख्यालयाला वीजपुरवठा करणाऱ्या वीज युनिटमध्ये गुरूवारी सकाळी स्फोट झाला. शुक्रवारी संध्याकाळर्पय़त वीज पुरवठा खंडित झाल्याने पालिका मुख्यालयाचा वीज पुरवठा ३३ तास बंद होता. डिझेल जनरेटरवर या कालावधीत वीजपुरवठा सुरू ठेवल्याने पालिकेला सुमारे ५५ हजाराच्या डिझेलचा भुर्दंड पडला असल्याचे सांगण्यात येते.
वीजपुरवठा खंडित झाल्याने पालिकेच्या दोन्ही इमारतींना डिझेल जनरेटरद्वारे वीज पुरवठा सुरू करण्यात आला होता. एका तासाला सुमारे ३५ लिटर डिझेल लागते. डिझेलचा दर आणि ३३ तास गायब असलेली वीज विचारात घेता या कालावधीत पालिकेचा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी सुमारे ५५ हजार रूपयांचे डिझेल लागले असल्याचे पालिकेतील एका सूत्राने सांगितले. या कालावधीत सुमारे ५०० ते ६०० लीटर लागले असण्याची शक्यता सूत्राने व्यक्त केली. पालिकेच्या विद्युत उपअभियंत्याने महावितरणच्या चुकीमुळे युनिटमध्ये स्फोट झाल्याचे सांगितले. शुक्रवारी संध्याकाळी वीज पुरवठा पूर्ववत केला असल्याचे सांगण्यात आले