राज्य सरकारच्या तिन्ही वीज कंपन्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी प्रत्येकी आठ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय ऊर्जामंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केला आहे. राज्य सरकारच्या महानिर्मिती, महापारेषण, महावितरण या तिन्ही वीज कंपन्यांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान मिळावे याबाबत कर्मचारी संघटनांनी मागणी केली होती. त्यानुसार चर्चा, वाटाघाटी होऊन प्रत्येकी आठ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे ठरविण्यात आले. या निर्णयाचा लाभ तिन्ही वीज कंपन्यांमधील एकूण एक लाख अधिकारी-कर्मचाऱ्यांना होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power employee will get 8000 bonus