इ. स. २००० पर्यतच्या झोपडय़ांना संरक्षण द्यावे, मालमत्ता कर कमी करावा, म्हाडा इमारतींचा पुनर्विकास आदी विविध मागण्यांसाठी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर मुंबईत राष्ट्रवादीने काढलेला एवढा पहिलाच मोठा मोर्चा आहे.
मुंबईत कितीही प्रयत्न केले तरी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढू शकलेली नाही. नवे अध्यक्ष खासदार संजय दिना पाटील यांनी शहरात पक्ष वाढीकरिता पुढाकार घेतला आहे. मुंबईतील झोपडय़ा, बीडीडी चाळी, म्हाडा इमारती, वाढीव मालमत्ता कर आदी सर्वसामान्यांशी निगडीत प्रश्नांवर जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात आला होता. राष्ट्रवादीचा मुंबईतील आतापर्यंतचा सर्वात मोठा मोर्चा आहे. खासदार पाटील यांच्यासह उदयप्रताप सिंग, सुभाष मयेकर, रविंद्र पवार आदी सामील झाले होते. शिष्टमंडळाने विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. राष्ट्रवादीच्या वतीने हाती घेण्यात आलेले विषय यापूर्वीच काँग्रेसच्या अजेंडय़ावर आहेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतानाही प्रा. जनार्दन चांदूरकर यांनी राष्ट्रवादीने मोच्र्यात मांडलेल्या मागण्यांवर सोमवारी उहापोह केला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा