राज्यात ‘ऑक्टोबर हीट’च्या चटक्यांच्या तीव्रतेबरोबरच वीजमागणीचा आलेखही उंचावत असून ‘महावितरण’ने १४ ऑक्टोबर रोजी तब्बल ३७०.९८ दशलक्ष युनिट वीज पुरवत पुन्हा एकदा वीजपुरवठय़ाचा उच्चांक गाठला.
उन्हाच्या तडाख्यामुळे पंखे, वातानुकूलन यंत्रणेचा वापर चांगलाच वाढला असून पाच ऑक्टोबर रोजी ‘महावितरण’ने ३६४.५७ दशलक्ष युनिट वीज राज्याला पुरवली होती. तर २९ सप्टेंबर २०१४ रोजी ३६२ दशलक्ष युनिट वीज पुरवठा झाला होता. त्यानंतर आता दहा दिवसांच्या आत पुन्हा एकदा वीजमागणीचा आणि पुरवठय़ाचा उच्चांक नोंदवला गेला.
मंगळवारी राज्यात विजेची मागणी १७ हजार ५७३ मेगावॉट होती. तर ‘महावितरण’ने १७ हजार २०० मेगावॉटचा पुरवठा केला. ३०० मेगावॉटचे भारनियमन करण्यात आले. एक ऑक्टोबरपासूनच राज्यात सतत १६ हजार मेगावॉटपेक्षा अधिक वीज पुरवली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा