मुंबई : शिवडी-वरळी उन्नत मार्गाअंतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकाला जोडणारा सध्याचा प्रभादेवी पूल बंद करून तो पाडण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) हा पूल पाडून त्याजागी नवीन द्विस्तरीय पूल (डबलडेकर पूल) बांधणार आहे. हा पूल बंद करण्यासाठी, पुलाच्या पाडकामासाठी परवानगी देण्याकरीता वाहतूक पोलिसांनी आता नागरिकांकडून सूचना-हरकती मागविल्या आहेत.

वाहतूक कशी वळवावी, कोणते पर्याय वाहतुकीसाठी असतील, अशा अनेक सूचना नागरिकांना करता येणार आहेत. नागरिकांना १३ एप्रिलपर्यंत addlep.trffic@mahapolice.gov.in या ई-मेल आयडीवर सूचना हरकती पाठवता येणार आहेत. सूचना-हरकती जाणून घेऊन त्यानंतर हा पूल बंद करण्यासाठी परवानगी देण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वाहतूक पोलिसातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. तर परवानगी मिळताच पुलाचे पाडकाम करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली.

वाहतुकीतील बदल असे. . .

पश्चिम मार्गिका बंद झाल्यानंतर हे पर्याय दादर पश्चिम परिसरात जाणारी वाहतूक मडके बुवा चौक येथून उजवे वळण घेऊन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाने खोदादाद सर्कल येथून डावे वळण घेऊन टिळक पूल मार्गे इच्छितस्थळी जातील. प्रभादेवी आणि वरळी परिसरात जाणारी वाहतूक ही मडके बुवा चौक येथून सरळ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाने कृष्ण नगर जंक्शन – परळ वर्कशाॅप – सुपारी बाग जंक्शन – भारतमाता जंक्शन येथून उजवे वळण घेऊन महादेव पालव मार्गाने करी रोड पुलावरून शिंगेट मास्तर चौकवरून उजवे वळण घेऊन लोअर परळ पूल मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रभादेवी आणि वरळी परिसरात जाणारी वाहतूक मडके बुवा चौक येथून सरळ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाने कृष्ण नगर जंक्शन, परळ वर्कशाॅप, सुपारी बाग जंक्शन -भारतमाता जंक्शन, संत जगनाडे चौक उजवे वळण घेऊन साने गुरुजी मार्गाने चिंचपोकळी रेल्वे पुलावरून काॅ. गुलाबराव गणाचार्य चौकवरून उजवे वळण घेऊन एन. एम. जोशी मार्गे इच्छितस्थळी जातील. शीव, माटुंगाकडून प्रभादेवी पूल मार्गे प्रभादेवी व वरळीकडे जाणारी वाहतूक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून खोदादाद सर्कल येथून उजवे वळण घेऊन टिळक पूल मार्गे इच्छित स्थळी जातील.

पूर्व मार्गिका बंद केल्यानंतरचे पर्याय

प्रभादेवी पूल मार्गे परळ परिसरात जाणारी वाहतूक ही संत रोहिदास चौक येथून सरळ वडाचा नाका जंक्शन येथून डावे वळण घेऊन लोअर परळ पूल मार्गे शिंगटे मास्तर चौक येथून डावे वळण घेऊन महादेव पालव मार्गाने करी रोड रेल्वे पुलावरून भारतमाता जंक्शन येथून इच्छित स्थळी जातील.प्रभादेवी पूल मार्गे परळ परिसरात जाणारी वाहतूक संत रोहिदास चौक येथून सरळ वडाचा नाका जंक्शन येथून डावे वळण घेऊन लोअर परळ पूल मार्गे पुढे शिंगटे मास्तर चौकावरुन सरळ एन.एम. जोशी मार्ग, काॅ. गुलाबराव गणाचार्य चौकावरून डावे वळण घेऊन साने गुरुजी मार्गाने चिंचपोकळी पुलावरून पुढे संत जगनाडे चौक येथून डावे वळण घेऊन इच्छित स्थळी जातील.

सयानी रोड आणि श. ल. मटकर मार्गाने प्रभादेवी पूल मार्गे परळ परिसरात जाणारी वाहतूक संत रोहिदास चौक येथून उडवे वळण घेऊन पुढे वडाचा नाका जंक्शन येथून डावे वळण घेऊन लोअर परळ पूल मार्गे शिंगटे मास्तर चौक, डावे वळण घेऊन महादेव पालव मार्गाने करी रोड रेल्वे पूलावरुन भारतमाता जंक्शन येथून इच्छितस्थळी जातील.

सेनापती बापट मार्गे प्रभादेवी पूल मार्गे शीव, माटुंगा परिसरात जाणारी वाहतूक सेनापती बापट मार्गावरून डावे वळण घेऊन व्ही. एम. मटकर मार्गे आणि बाबुराव परुळेकर मार्ग येथून उजवे वळण घेऊन भवानी शंकर रोडने पुढे कबुतरखाना येथून हनुमान मंदिर सर्कल येथून उजवे वळण घेऊन एन. सी. केळकर रोडने कोतवाल गार्डन येथे उजवे वळण घेऊन टिळक पूल मार्गे खोदादाद सर्कल येथून इच्छित स्थळी जातील.

नो पार्किंग कुठे असणार ?

ना. म. जोशी मार्ग – आर्थर रोड नाका ते धनमिल नाक्यापर्यंत दोन्ही वाहिनी

ना. म. जोशी मार्ग – एसिक भवन ते वडाचा नाक्यापर्यंत दोन्ही वाहिनी

सेनापती बापट मार्ग – संत रोहिदास चौक ते रखांगी जंक्शनपर्यंत दोन्ही वाहिनी

महादेव पालव मार्ग – काॅ. कृष्णा देसाई चौक ते शिंगटे मास्तर चौकापर्यंत दोन्ही वाहिनी

साने गुरुजी मार्ग – संत जगनाडे चौक ते काॅ. गुलाबराव गणाचार्य चौकापर्यंत दोन्ही वाहिनी

भवानी शंक मार्ग- हनुमान मंदिर , कबुतरखाना ते गोपीनाथ चव्हाण चोकापर्यंत दोन्ही वाहिनी

रावबहाद्दुर एस. के. बोले मार्ग – हनुमान मंदिर ते पोर्तुगिज चर्चपर्यंत दोन्ही वाहिनी