करोना आणि टाळेबंदीच्या काळात शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचा अभ्यास थांबलेला नव्हता, विशेषत: दहावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास तर सुरू आहेच. म्हणूनच!‘टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत लोकसत्ता यशस्वी भव’ या लेखमालेच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयाचे मार्गदर्शनपर लेख दिले जात होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमातील सर्व विषय आणि त्यातील बारकावे समजावून देणारे हे लेख विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरले आहेत. परंतु कोणत्याही परीक्षेसाठी सखोल अभ्यासाइतकाच आवश्यक असतो प्रत्यक्ष प्रश्नांचा सराव. म्हणूनच आता ‘लोकसत्ता यशस्वी भव’ या लेखमालेतून १ नोव्हेंबरपासून सराव कृतिपत्रिका दिल्या जाणार आहेत. या कृतिपत्रिका सोडवून पाहताना विद्यार्थ्यांचा सराव तर होईलच, शिवाय कोणते विषय, घटक यांचा अभ्यास झालेला आहे, कोणता करणे गरजेचे आहे, याचा अंदाजही घेता येईल.

राज्य शिक्षण मंडळाच्या मूळ आराखडय़ानुसार पूर्ण गुणांवर आधारित या कृतिपत्रिका असतील. प्रत्येक विषयाची एक कृतिपत्रिका सोडवून दिली असेल. तसेच राज्य शिक्षण मंडळाच्या निर्णयात काही बदल झाल्यास कृतिपत्रिकेतही तो करण्यात येईल.