मुंबई : लाडकी बहीण योजना राज्याच्या विधानसभा निवडणुकीत खूप गाजली हे जरी खरे असले तरी गर्भवती माता व त्यांच्या नवजात बालकांचे तसेच स्तनदा मातेचे आरोग्य सुधारावे व त्यांना सकस पोषण आहार मिळून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी, या हेतूने राज्यात गेली अनेक वर्षे राबविण्यात येत असलेली प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे महत्व खर्या अर्थाने जीवनदायी म्हणावे लागेल. या योजनेचा आतापर्यंत ३५ लाख २६ हजार २६५ मतांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

गरोदरपणात आणि बाळंतपणात महिलांना आरोग्य सेवा-सुविधा आणि प्रोत्साहनाच्या माध्यमातून कुपोषणाचा प्रभाव कमी करणे आणि माता व बाल आरोग्य सुधारणे हा प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत पहिल्या अपत्यासाठी दोन हप्त्यांत ५,००० रुपयांची मदत दिली जाते. पहिला हप्ता ३,००० रुपयांचा असून त्यासाठी राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या शासकीय आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी आणि शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून ६ महिन्यांच्या आता किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी करणे आवश्यक आहे. दुसरा हप्ता २,००० रुपये असून त्यासाठी बाळाची जन्म नोंदणी आणि बालकास बीसीजी, ओपीव्ही झीरो, ओपीव्ही ३ मात्र, पेन्टाव्हॅलेन्टलसीच्य ३ मात्रा अथवा पर्यायी लसीकरणाचे प्राथमिक चक्र पूर्ण करणे आवश्यक आहे. दुसरे अपत्य मुलगी असल्यास तिच्या जन्मानंतर एक रकमी ६,००० रुपये मदत दिली जाते. त्यासाठी जन्म दाखला असणे आवश्यक असून बालकाचे पेन्टा ३ पर्यंतचे (१४ आठवडे) लसीकरण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. प्रारंभ करण्यात आला. या योजनेंतर्गत २०१७ ते मार्च २०२४ कालावधीत ३५,२६,२६५ लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे.

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
students failed in 5th and 8th standard in maharashtra
राज्यात पाचवी, आठवीचे किती विद्यार्थी अनुत्तीर्ण?
cm devendra fadnavis gharkul scheme
Devendra Fadnavis : सरकारी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…
Transfer of Rs 1500 aid under Ladki Bahin scheme resumes in Maharashtra
Ladki Bahin scheme : ६७ लाख ‘लाडक्या बहिणीं’ च्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा
CAG report reveals errors in Maharashtras health services from 2016 to 2022
राज्यातील आराेग्य व्यवस्थेवर कॅगचे ताशेरे
Incentive Allowance anganwadi sevika
‘लाडक्या बहिणी’ जमविणाऱ्या ‘ताई’च उपेक्षित!
Kalyan Dombivli Municipal corportion,
कल्याण : तीन महिन्यांत ५७५ कोटीच्या मालमत्ता कर वसुलीचे आव्हान

हेही वाचा…शुद्ध हवेसाठी गोरगाववासियांची धडपड

केंद्र शासनाच्या १४ जुलै २०२२ रोजीच्या पत्रानुसार प्रधानमंत्री मातृ वंदना योजना दोन ही नव्या स्वरुपात देशात लागू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये पूर्वी केवळ पहिल्या अपत्यासाठी लाभ मिळत असे, मात्र आता नवीन संकल्पनेनुसार १ एप्रिल २०२२ नंतर दुसरे अपत्य मुलगी जन्माला आल्यानंतरच्या लाभार्थीचा देखील या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. नवीन निकष पात्र लाभार्थी शोधून आशा किंवा अंगणवाडी सेविका त्यांच्या कार्यक्षेत्रातील लाभार्थीची ऑनलाइन पीएमएमव्हीवाय सॉफ्टवेअरमध्ये लाभार्थी नोंदणी केली जाते. लाभार्थी पहिल्या खेपेचा असेल तर दोन टप्प्यात फॉर्म भरला जातो. दुसऱ्या जिवंत अपत्याच्या वेळी मुलगी असणारे लाभार्थी असतील त्यांचे एकच टप्प्यात फॉर्म भरला जातो. याशिवाय पात्र लाभार्थी पोर्टलवर स्वतः लाभासाठी नोंदणी करू शकतात.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत गेल्या वर्षभरात जानेवारी २०२४ ते नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यातील २,८२,२३९ लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून, सन २०२०-२१ मध्ये ५,४७,२१९, सन २०२१-२२ मध्ये ६,०९,९२१, सन २०२२-२३ मध्ये ५,२१,७५० आणि सन २०२३-२४ मध्ये १,१९,८२८ लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहेत.

हेही वाचा…हाजीअली येथील हिरापन्ना शॉपिंग सेंटरमध्ये आग, दोन दिवसांत आगीच्या तीन घटना

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी खालीलपैकी किमान एक गटातील असणे आवश्यक आहेत.ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्ष कमी आहे. तसेच अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा ज्या महिला ४० टक्के किंवा पूर्णतः दिव्यांग आहेत. बीपीएल शिधापत्रिका धारक महिला. आयुष्मान भारत अंतर्गत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत महिला लाभार्थी. इ- श्रम कार्ड धारण करणाऱ्या महिला. किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी. मनरेगा जॉब कार्ड घेतलेल्या महिला.गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्ती. अन्नसुरक्षा कायदा २०१३ अंतर्गत रेशनिंग कार्ड धारक महिलांना या योजनेचा लाभ मिळतो असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय,जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय आदी ठिकाणी गरोदर मातांची मोफत तपासणी व प्रसूती होते.

Story img Loader