भाजपच्या तिजोरीची जबाबदारी सांभाळलेल्या केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल व त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर १०० कोटींची मालमत्ता असून, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल हे सुमारे २५० कोटींच्या मालमत्तेचे धनी आहेत. दिवाकर रावते आणि सुभाष देसाई या शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये रावते अधिक ‘श्रीमंत’ आहेत.
पीयूष गोयल यांनी स्वत:, पत्नी आणि दोन मुलांची एकूण जंगम (गुंतवणूक, सोने-चांदी व बँक खात्यातील रक्कम) मालमत्ता ७८ कोटींची दाखविली आहे. गोयल यांनी १६ कोटींची स्थावर मालमत्ता असल्याची माहिती दिली आहे. म्हणजेच स्थावर व जंगम अशी एकूण ९४ कोटींची गोयल यांची मालमत्ता आहे. पीयूष गोयल यांनी स्वत:च्या नावावर २५ कोटी, २५लाखांची मालमत्ता दाखविली आहे. पत्नी सीमा (५० कोटी, ५७लाख), मुलगा (१ कोटी ३९ लाख) तर मुलीच्या नावे एक कोटी, २२ लाखांची मालमत्ता आहे. पीयूष गोयल यांच्या नावावर दोन कोटी तर पत्नीच्या नावावर पावणे दोन कोटींचे सोने-चांदी व हिऱ्यांचे दागिने आहेत. गोयल यांनी सहा कोटींची गुंतवणूक केल्याचे दाखविले आहे. स्वत: गोयल यांच्या नावावर बँकेत ५१ लाख कर पत्नीच्या नावे २६ लाख बँकेत जमा आहेत. रोख्यांमध्ये साडेतीन कोटी रुपये गुंतविले आहेत. शरद पवार किंवा अन्य नेत्यांच्या नावांवर गाडय़ा नसल्या तरी गोयल यांच्या नावे ५० लाखांच्या दोन गाडय़ा आहेत. गोयल यांच्या नावावर सव्वा तीन कोटींची व पत्नीच्या नावे १३ कोटी ३८ लाख रुपयांची मालमत्ता आहे.
प्रफुल्ल पटेल २५० कोटी तर पीयूष गोयल ९४ कोटींचे धनी !
शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे एकूण नऊ कोटींची मालमत्ता आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-05-2016 at 02:41 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Praful patel piyush goyal