मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी पुणे – मुंबई – पुणे मार्गावर पुन्हा एकदा प्रगती एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाकाळात प्रगती एक्स्प्रेस बंद होती. प्रगती एक्स्प्रेस पुन्हा सुरू करताना तिला विस्टाडोम डबा (पारदर्शक काचेचा डबा) जोडण्यात येणार आहे. ही गाडी २५ जुलैपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. मडगाव एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस पूर्वीपासूनच विस्टाडोम डब्यांसह धावत आहेत.

गाडी क्रमांक १२१२५ प्रगती एक्स्प्रेस सीएसएमटी येथून २५ जुलैपासून दुपारी ४.२५ वाजता सुटेल आणि पुणे येथे सायंकाळी ७.५० वाजता पोहोचेल. तर गाडी क्रमांक १२१२६ पुणे येथून सकाळी ७.५० वाजता सुटेल आणि सकाळी ११.२५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. ही एक्स्प्रेस दादर, ठाणे, पनवेल, कर्जत, लोणावळा, शिवाजी नगर येथे थांबेल. या गाडीला ११ द्वितीय श्रेणीचे आसन डबे जोडण्यात आले आहेत. यातील पाच डबे आरक्षित आणि चार अनारक्षित, एक डबा पासधारकांसाठी आणि एक महिलासाठी राखीव असणार आहे. एका वातानुकूलित आसन डबाचाही समावेश आहे. एक जनरल द्वितीय श्रेणी डबाही जोडण्यात आला आहे. या गाडीचे आरक्षण २० जुलैपासून उपलब्ध आहे.

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
Action will be taken against employees who refuse election work
निवडणूकीचे काम नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर
india railway viral news Husband-Wife Fight
नवरा-बायकोतील भांडण अन् रेल्वेचे तीन कोटींचे नुकसान! OK मुळे चुकीच्या स्थानकावर पोहोचली ट्रेन; नेमकं घडलं काय? वाचा…
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?

प्रगती एक्स्प्रेसला विस्टाडोम डबा

मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला पहिल्यांदा २०१८ मध्ये विस्टाडोम डबा जोडण्यात आला होता. या डब्यांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे २६ जून २०२१ पासून मुंबई – पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्येही विस्टाडोम डबा जोडण्यात आला. प्रवाशांच्या मागणीनंतर १५ ऑगस्ट २०२१ पासून मुंबई – पुणे मार्गावरील डेक्कन क्वीनलाही हा डबा जोडल्याचे मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. आता मुंबई – पुणे मार्गावर सुरू करण्यात येत असलेल्या प्रगती एक्स्प्रेसलाही विस्टाडोम डबा जोडण्यात येणार आहे. काचेच्या छताशिवाय रुंद खिडक्या, एलईडी दिवे, उत्तम आसन व्यवस्था, जीपीएस आधारित माहिती प्रणाली, एलईडी स्क्रिन, दिव्यांगांसाठी रुंद सरकते दरवाजे अशा अनेक सुविधांचा त्यात समावेश आहे.