विधानसभेत आज ( ३ मार्च ) भटक्या कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर आमदार प्रताप सरनाईक, आमदार अतुल भातळखर, आमदार सुनील टिंगरे यांनी भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू यांनी भटक्या कुत्र्यांना आसामला पाठवण्यात यावं, असा अजब सल्ला सरकारला दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भटक्या कुत्र्यांबाबत सुरु असलेल्या लक्षवेधीवर बोलताना बच्चू कडू यांनी म्हटलं की, खरे तर भटक्या कुत्र्यावर सोप्पा इलाज आहे. पाळीव कुत्रे रस्त्यांवर येत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. याच्यावर समिती नेमण्यापेक्षा कृती योजना जाहीर करायला हवी. एखाद्या शहरात तसा प्रयोग करण्यात यावा.

हेही वाचा : “रोग हाल्याला अन् इंजेक्शन…”, ST कर्मचाऱ्याला निलंबन केल्यावरून अजित पवार शिंदे सरकारवर संतापले

“रस्त्यांवर असलेल्या भटक्या कुत्र्यांना उचलून आसाममध्ये नेऊन टाका. आसाममध्ये कुत्र्यांना किंमत आहे. आठ ते नऊ हजार रुपयांना कुत्रे विकले जातात. आम्ही गुवाहाटीला गेल्यावर तिथे कळलं, जसं आपल्याकडं बोकडाचं मांस खाल्लं जातं. तसे, तिकडे कुत्र्यांचं मांस खाल्लं जातं,” असं बच्चू कडूंनी सांगितलं.

हेही वाचा : संदीप देशपांडेंवरील हल्ल्यावरून सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला; म्हणाल्या, “गृहमंत्री म्हणून…”

“त्यामुळे तेथील व्यापाऱ्याला बोलवून यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. एक दिवसांत याच्यावर तोडगा निघेल. यासाठी तेथील सरकारशी बोलण्याची गरज आहे. याचा उद्योग होईल आणि ते घेऊन जातील. एकदाचा विषय संपवून टाका,” असं बच्चू कडूंनी म्हटलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prahar sanghtana mla bacchu kadu on street dogs say send guwahati ssa