मुंबई : तुम्ही त्यांचे पक्ष वाचवलेत, पण तुम्ही त्यांच्या खिजगणतीतही नाही, असे बजावत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दलित-बौद्ध समाजाला शहाणे होण्याचा सल्ला दिला आहे. आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा लक्ष केले आहे.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दलित, मुस्लीम, बौद्ध, ख्रिाचन, बहुजन यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला मतदान केले. तरीसुद्धा दलित, बौद्ध यांच्या भूमिकेचा साधा उल्लेख करावा, असे त्यांना वाटत नाही. तुम्ही त्यांचे पक्ष वाचवले.

आता तरी दलित आणि बौद्धांने आता तरी शहाणे व्हा, असे आंबेडकर यांनी समाजमाध्यमांवर म्हटले आहे.१५ जून रोजी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. त्यानिमित्ताने शिवसेना उद्धव ठाकरे गटाने एक डिजिटल पोस्टर प्रकाशित केले होते. लोकशाही वाचवण्यासाठी मराठी, हिंदु, मुस्लीम आणि ख्रिाश्चन यांनी मतदान केल्याचा उल्लेख त्यामध्ये आहे. मात्र दलितांचा उल्लेख नाही. त्यावर बोट ठेवत आंबेडकर यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar advice to buddhists dalits amy
First published on: 18-06-2024 at 07:20 IST