“पॅलेस्टाईनमध्ये वैद्यकीय व इतर मदत पाठवण्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोण रोखत आहे?” असा प्रश्न विचारत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारला घेरलं. त्यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर पोस्ट करत पॅलेस्टाईन-इस्रायल युद्धावर भारताची भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावर अडचणीची ठरत असल्याची टीका केली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि भाजपा-आरएसएसने नाईलाजाने पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला आहे. इस्रायलकडून झालेल्या बॉम्ब हल्ल्याचे भाजपा-आरएसएसच्या गुंडांनी केलेले समर्थन आणि कौतुक, इस्रायलने केलेल्या गाझा रहिवाशांच्या सामूहिक कत्तली आणि त्याचे यांच्याकडून होणारे लाजिरवाणे समर्थन यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची स्थिती विचित्र आणि अडचणीची झाली आहे.

prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
devendra fadnavis chhagan bhujbal ajit pawar
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं नाव घेत म्हणाले, “छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नाही त्यामागे…”
loksatta readers feedback
लोकमानस: राज्यात आरोग्यव्यवस्थेकडे दुर्लक्षच होणार?
Case against Kejriwal Officials claim that Lieutenant Governor gave permission
केजरीवाल यांच्याविरोधात खटला? नायब राज्यपालांनी परवानगी दिल्याचा अधिकाऱ्यांचा दावा; ‘आप’कडून खंडन
Dilip Walse Patil :
Dilip Walse Patil : “१५०० मतांनी निवडून आलोय अन् काय सांगू मला मंत्री करा?”, दिलीप वळसे पाटलांचं विधान चर्चेत
Prakash Ambedkar
“RSS ने बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलाला विरोध केलेला”, प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल; म्हणाले, “भाजपा लोकांचं लक्ष वळवण्यासाठी…”
Devendra Fadnavis News in Marathi
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “आम्ही निवडणुकीत सगळे बॅट्समन मैदानात उतरवले आणि..”

“मदत पाठवण्यापासून मोदींना कोण रोखत आहे?”

“पॅलेस्टाईनबद्दल भारताचे ‘दीर्घकाळ आणि सातत्यपूर्ण’ धोरण खरोखरच न बदलणारे राहिले असेल, तर या युद्धात अडकलेल्या पॅलेस्टिनी मुले, महिला आणि नागरिकांसाठी पॅलेस्टाईनमध्ये वैद्यकीय आणि इतर मदत पाठवण्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणती गोष्ट रोखत आहे?” असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी विचारला.

https://x.com/Prksh_Ambedkar/status/1714503355593261445

“अप्रत्यक्षपणे मोदी भाजपा-आरएसएसच्या गुंडांचे तुष्टीकरन”

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, “पॅलेस्टाईन मुलांसाठी आणि महिलांसाठी मदत व गरजेचे साहित्य न पाठवता अप्रत्यक्षपणे मोदी भाजपा-आरएसएसच्या गुंडांचे तुष्टीकरन करण्याचा प्रयत्न करत आहे का?”

हेही वाचा : VIDEO: गाझातील रुग्णालयात स्फोट होऊन ५०० जणांचा मृत्यू, पॅलेस्टिनकडून इस्रायलवर गंभीर आरोप, म्हणाले…

“वाजपेयींसह सर्व माजी पंतप्रधानांच्या तत्त्वनिष्ठ भूमिकेच्या पूर्णपणे उलट”

“पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाबाबत भारताची सध्याची मवाळ भूमिका ही दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह सर्व माजी पंतप्रधानांच्या तत्त्वनिष्ठ भूमिकेच्या पूर्णपणे उलट आहे. पॅलेस्टिनींच्या बाजूने भारताने विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर ठाम भूमिका मांडली पाहिजे,” असं आंबेडकरांनी म्हटलं.

Story img Loader