महिलांवरील अत्याचार रोखण्याकरिता सध्याच्या कायद्यांमधील पळवाटा बुजविण्यावर विचार करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
अत्याचारांविरोधात केवळ रस्त्यावर उतरणे आणि प्रसिध्दीमाध्यमातून चर्चा करण्यापेक्षा संसदेच्या विशेष अधिवेशनात विचारविनिमय केला गेला पाहिजे. फौजदारी दंडसंहिता व भारतीय दंडविधानात आवश्यक दुरूस्त्या करण्यात आल्या पाहिजेत, असे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले.
महिलांवरील अत्याचाराचे खटले चालविण्यासाठी विशेष जलदगती न्यायालये स्थापन करण्याची आवश्यकता आहे. दीर्घकाळ हे खटले प्रलंबित राहता कामा नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले.   

Story img Loader