मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २५ नोव्हेंबरला मुंबईत शिवाजी पार्कवर संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना तसे पत्र पाठविले आहे.  देशात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच्या पूर्वसंध्येला २५ नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिवाजी पार्कवर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> उपनगरांतील पुनर्विकास महाग;‘धारावी टीडीआर’चा विकासकांना फटका

malang gad festival
मलंग गडाच्या उत्सवासाठी दोन्ही शिवसेनेची मोर्चेबांधणी; दोन्ही गटांकडून भाविकांना आवाहन, दोघांकडून तयारी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
K T Rama Rao On Delhi Election Result
Delhi Election Result : ‘विजय भाजपाचा, पण अभिनंदन राहुल गांधींचं…’; BRS च्या कार्याध्यक्षांची दिल्लीच्या निकालावर खोचक प्रतिक्रिया!
Rahul Gandhi on Maharashtra election result
राज्याच्या निकालाचे संसदेत पडसाद; निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर राहुल गांधींकडून शंका
Rahul Gandhi Lok Sabha speech update
राहुल गांधी यांची फटकेबाजी; लोकसभेत विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीका; सत्ताधारी खासदार संतप्त
controversy over dhirendra shastri moksha remark
उलटा चष्मा:मोक्ष मिळवून दिला जाईल!
Leopard Safari at Sanjay Gandhi Park Announcement by Guardian Minister Ashish Shelar Mumbai news
संजय गांधी उद्यानात ‘बिबट्या सफारी’; पालकमंत्री आशिष शेलार यांची घोषणा
Gajendra singh shekhawat
शिवनेरी अंबरखाना संग्रहालयासह वारसा संवर्धनासाठी निधी, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री शेखावत यांचे आश्वासन

या सभेला उपस्थित राहण्यासाठी राहुल गांधी यांना खास निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिली. सध्या देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप संविधानिक मूल्ये आणि आदर्श नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्याशी लढण्याच्या आपल्या दोघांच्या वचनबद्धतेच्या आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या आधारावरून, वंचित बहुजन आघाडी या माझ्या पक्षाच्या वतीने तुम्हाला संविधान सन्मान महासभेचे निमंत्रण देतो, या निमित्ताने तुम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो लोकांना संबोधित करण्याची आणि भारताच्या भविष्याबद्दलचा तुमचा दृष्टिकोन, भूमिका मांडण्याची संधी मिळेल, असे या पत्रात म्हटले आहे.

Story img Loader