मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हुकुमशाही रोखण्यासाठी  सर्वांनी एकत्र यावे, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केले आहे. भाजपच्या विरोधात उभ्या राहिलेल्या इंडिया आघाडीत सहभागी होण्याची वंचित आघाडीची इच्छा आहे, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> रश्मी शुक्ला महासंचालक की आयुक्तपदी?

 आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले असून, महाविकास आघाडीतील जागावाटपाचा वाद मिटविण्यासाठी वंचित आघाडीने सुचविलेले राज्यातील ४८ जागांचे चार पक्षांत समान वाटप करण्याचे सूत्र स्वीकारावे, असे आवाहन केले आहे.  महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील तीन घटक पक्षांमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. देशात दुसऱ्या क्रमांकाच्या जागा असलेल्या राज्यातील, जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीकडून कोणताही ठोस निर्णय होताना दिसत नाही. महाराष्ट्रातील जागावाटपाचा हा घोळ मिटविण्यासाठी वंचित आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने एक सूत्र समोर ठेवले आहे. आघाडीतील तीन घटक पक्ष आणि वंचित आघाडी यांनी समसमान म्हणजे प्रत्येकी १२ जागा लढवाव्यात, त्याचा विचार करावा, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.