जिंकून येणं मतदारांच्या हातात आहे. ते राजकीय पक्षांच्या हातात नाही. परंतु, उमेदवारी देणं राजकीय पक्षांच्या हातात आहे. महाराष्ट्राची सत्ता १६९ कुटुंबात होती. त्यात आता १० कुटुंबात वाढ झाली आहे. नातेवाईकांचं राजकारण वाढल्याने गरिबांचं राजकारण बाजूला पडत गेलं. त्यामुळे भांडवलशाही आणि लुटारुंची सत्ता सुरु झाली, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “…म्हणून आम्ही दोघे एकत्र आलो आहोत”, उद्धव ठाकरेंनी सांगितलं प्रकाश आंबेडकरांबरोबरच्या युतीचं कारण

शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यांशी संवाद साधला. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना एकत्र आल्याने निवडणुकीत बदलाचं राजकारण सुरुवात होणार आहे. जनता दलाचा जाहीरनामा आजही काढला तर शेवटं लिहलं होतं, आम्ही मंडल कमिशन लागू करू. दुर्दैवाने जनता दलाचा पक्ष मंडल कमिशनवर पडला, अशी परिस्थिती आहे. सामाजिक प्रश्नाला हात घातला जातो, तेव्हा समाजव्यवस्थेमधील गणिते बदलली जातात.”

हेही वाचा : ठाकरे गट-वंचितच्या युतीची घोषणा, पण ‘फॉर्म्यूला’ काय? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट; म्हणाले “पुढची राजकीय वाटचाल…”

“गेली अनेक वर्षे उपेक्षितांचं राजकारण सुरु होण्यासाठी प्रयत्न केला. ही चळवळ आम्ही चालवत होतो. तिला आमच्या मित्र पक्षाने गिळंकृत किंवा मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला. पण, आम्ही न जुमानता आंदोलन करत राहिलो, लढत राहिलो,” असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar on shivsena and vanchit bahujan aghadi alliance ssa