बौद्धांसाठी स्वतंत्र विवाह कायद्याची मागणी होत असली तरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीच त्याला विरोध केला आहे. किंबहुना हिंदू, मुस्लिम व इतर धर्मीयांसाठीही नोंदणी पद्धतीच्या विवाहाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने तसे कायदेशीर प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी लोकसत्ताशी बोलताना केली.
ज्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे, त्यांचे विवाह मात्र हिंदू विवाह कायद्यानुसार वैध ठरविले जात आहेत. त्यामुळे बौद्धांसाठी स्वतंत्र विवाह कायदा करावा, अशी मागणी पुढे येत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेशी संबंध असलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी मात्र त्याला विरोध केला आहे. बाबासाहेबांनी धर्म याऐवजी धम्म ही संकल्पना मांडली. हीच पुरोगामी विचारधारा सर्व समाजात रुजावी आणि समाज कर्मकांडातून मुक्त व्हावा, अशी त्यामागची त्यांची संकल्पना होती. अशा वेळी कर्मकांडांचे जंजाळ माजविणारे धर्माच्या नावाने कायदे हवेत कशाला असा त्यांनी सवाल केला.
समान नागरी कायद्याची संघाला भीती
हिंदू विवाह कायदा, मुस्लिम विवाह कायदा, असे वेगवेगव्ळ्या धर्मासाठी वेगवेगळे कायदे असण्यापेक्षा एकच समान नागरी कायदा असावा, अशीही मागणी होत आहे. त्यावर समान नागरी कायद्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच जास्त भीती आहे, कारण तसे झाले तर त्यांना जातिव्यवस्था टिकवता येणार नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली.
स्वतंत्र बौद्ध विवाह कायद्याला आंबेडकरांचा विरोध
बौद्धांसाठी स्वतंत्र विवाह कायद्याची मागणी होत असली तरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर
First published on: 05-01-2014 at 03:31 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar opposes independent buddhist marriage law