लोकसभेचे भाजपा खासदार रमेश बिधुरी यांनी बहूजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली. यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर आरोप केला आहे. संसदेत मुस्लीम खासदाराला शिवीगाळ होत असताना काँग्रेसचे खासदार गप्प होते असं म्हणत त्यांनी काँग्रेस खासदार गप्प का होते असा प्रश्न विचारला आहे. प्रकाश आंबेडकरांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत हा आरोप केला.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेत एका भाजप खासदाराने मुस्लीम खासदारासाठी भडवा, कटवा (खंता झालेला), मुल्ला दहशतवादी आणि कट्टरवादी अशा अत्यंत अपमानास्पद शब्दांचा वापर केला आणि अपमान केला. मला आश्चर्य वाटते की, विरोधी बाकावरील एका मुस्लीम खासदाराला शिवीगाळ होत असताना काँग्रेस खासदार काय करत होते?”

Ajit Pawar and Suresh Dhas
Ajit Pawar : सुरेश धस यांनी उल्लेख केलेली मुन्नी कोण? विचारताच अजित पवार संतापून म्हणाले, “असल्या फाल्तू…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
bjp membership registration campaign target to add 50 lakh new members in maharashtra
भाजप सदस्यनोंदणी ! ‘ हे ‘ आमदार अव्वल तर ‘ हे ‘ पिछाडीवर
What Suresh Dhas Said ?
Suresh Dhas : “…यांनी बीडचा ‘बिहार’ नाही तर ‘हमास’, ‘तालिबान’ केला”, सुरेश धस यांची टीका
Suresh Dhas and ajit pawar
Suresh Dhas : “अजितदादा, क्या हुआ तेरा वादा…”, सुरेश धसांनी परभणीची सभा गाजवली; ‘बिनमंत्र्यांचा जिल्हा’ ठेवण्याची मागणी!
bahubaliche beed loksatta article
बाहुबलीचे बीड : ‘विहिरी’तील कोट्यवधींच्या घबाडावर बाहुबली गब्बर, राखेतील परळीत ‘शांतता राखा’!
Suresh Dhas
Suresh Dhas : “पहिली पसंती मुख्यमंत्र्यांना, अजित पवार झाले तर…”, बीडच्या पालकमंत्री पदाबाबत सुरेश धस यांचं स्पष्ट मत
Indian Maldives loksatta editorial
अग्रलेख : शेजारसौख्याची शालीनता
https://x.com/Prksh_Ambedkar/status/1705101187975119154

नेमकं काय घडलं?

रमेश बिधुरी संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी लोकसभेचा चांद्रयान-३च्या यशबाबत बोलत होते. तेव्हा बसपाचे खासदार दानिश अली यांनी चांद्रयान-३ मोहिमेचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाटल्याचा आरोप केला. त्यावर रमेश बिधुरी संतापले आणि अपशब्दांचा उपयोग केला.

हेही वाचा : “आम्हाला फक्त समाजातच अस्पृश्य म्हणून वागवलं जात नाही, तर…”; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

रमेश बिधुरी काय म्हणाले?

“मोदीजी श्रेय घेत नाहीयेत. श्रेय देशाचे वैज्ञानिक घेत आहेत. ए भ**…ए उग्रवादी..बोलू देणार नाही तुला कधी उभं राहून. सांगून ठेवतोय. ए उग्रवादी..कठुवे…हे दहशतवादी आहेत… उग्रवादी आहेत.. हे मुल्ला दहशतवादी आहेत. याचं काही ऐकू नका, बाहेर फेका याला”, असं रमेश बिधुरी म्हणत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Story img Loader