प्रणवदा आज तुम्हाला नागपूर संघ मुख्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावरपाहून लाखो काँग्रेस कार्यकर्त्यांना दु:ख झाले आहे. भारतीय प्रजासत्ताकाची मुल्ये, बुहतत्ववाद आणि विविधतेवर विश्वास असणाऱ्यांना आज वेदना झाल्या आहेत असे टि्वट काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केले आहे.

प्रणव मुखर्जी यांनी आरएसएसच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारल्यापासून त्यांच्यावर काँग्रेसमधून टीका होत आहे. या टीकाकारांमध्ये आता आनंद शर्मांचा समावेश झाला आहे. प्रणव मुखर्जींवर त्यांच्या स्वत:च्या मुलीने टीका केली आहे. ज्यांना ऐकण्याची, आत्मसात करुन बदलण्याची इच्छा असते त्यांच्याशी चर्चा केली जाते. आरएसएस आपल्या मुख्य उद्देशापासून केव्हाच दूर गेली आहे असे आनंद शर्मा यांनी म्हटले आहे.

तुम्ही भाजपवाल्यांना खोट्या बातम्या आणि अफवा पसरवण्याची संधी देत आहात असं शर्मिष्ठा मुखर्जी यांनी म्हटलं आहे. काल रात्री सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार आणि काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी सुद्धा प्रणवदा मी तुमच्याकडून ही अपेक्षा केली नव्हती असे टि्वट केले.

Story img Loader