मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले असून त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. महत्त्वाचे म्हणजे मनोज जरांगे पाटील सध्या उपचार घेत आहेत. मात्र, सगे सोयऱ्यांच्या नियमांची अंमलबजावणी न झाल्यास उपचार घेणं बंद करेन, असा इशारादेखील त्यांनी दिला आहे. दरम्यान, जरांगे पाटलांच्या उपोषणाबाबत आता केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज सकाळी मुंबईतील शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान, त्यांना जरांगे पाटलांच्या उपोषणाबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, जरांगे पाटलांनी थोडं सबुरीने घ्यावं आणि सरकारला थोडा वेळ द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा – मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; उपोषणाचा चौथा दिवस, उपचार घेण्यास नकार

नेमकं काय म्हणाले प्रतापराव जाधव?

“राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयात टीकेल असं अभ्यासपूर्ण हे आरक्षण आहे. त्यानुसार जवळपास ५० लाखांपेक्षा जास्त कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप सुरू झालं आहे. त्यामुळे जरांगे पाटलांना आमची विनंती आहे, की त्यांनी थोडं सबुरीने घ्यावं, सरकारला थोडा वेळ द्यावा”, अशी प्रतिक्रिया प्रतापराव जाधव यांनी दिली.

पुढे बोलताना, “राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून कोणाताही वाद होऊ नये, एका समाजाला खूश करण्यासाठी दुसऱ्या समजातील असंतोष उफाळून येता कामा नये, त्यामुळे सर्व समाजाला न्याय मिळावा, अशी आमची भूमिका आहे”, असेही ते म्हणाले.

दरम्यान, आज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती चांगलीच खालावली आहे. त्यामुळे कालपासून त्यांनी उपचार घेण्यास सुरुवात केली आहे. एका मंत्र्याच्या सांगण्यावरून त्यांनी ही सलाईन लावली, असल्याचे त्यांनी त्यांनी सांगितलं आहे. गेल्या 10 महिन्यांपासून सरकारवर विश्वास ठेवत आहे. सगे सोयऱ्याची अंमलबजावणी पाच महिन्यापासून झालेली नाही. यासाठी एवढा वेळ लागत नाही, असे ते म्हणाले.