अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकर राहुल राज सिंगच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. न्यायालयाने राहुल सिंगचा अटकपूर्व जामीन फेटाळला असून कोणत्याही क्षणी राहुलला अटक होऊ शकते. राहुलवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येप्रकरणी बुधवारीच राहुल सिंगचे वकील नीरज गुप्ता यांनी खटल्यातून आपले वकीलपत्र मागे घेतले होते. अपेक्षित माहिती देत नसल्याचा कारण देत वकीलपत्र मागे घेत असल्याचे त्यांनी सांगितले होते. आता त्याचा अटकपूर्व जामीनही फेटाळण्यात आला आहे.
गेल्या शुक्रवारी गोरेगावमधील मोतीलालनगर येथील घरात प्रत्युषा बॅनर्जीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी राहुलविरोधात प्रत्युषाला आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader