अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्येचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून घेऊन गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करावा, या मागणीसाठी प्रत्युषाची आई शोमा यांनी बुधवारी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गुरूवारी त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. मात्र घटना ताजी असतानाच तपास वर्ग करण्याच्या प्रत्युषाच्या पालकांच्या मागणीबाबत न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर शोमा यांची याचिका बुधवारी सादर करण्यात आली. प्रकरणाचा तपास दिशाभूल करणारा आहे. त्यामुळे प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी शोमा यांचे वकील के. टी. थॉमस यांनी केली. त्यामुळेच प्रकरणाची तातडीने झाली.

Story img Loader