टेलिव्हिजन अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी गर्भपात केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. जे.जे. रूग्णालयातील डॉक्टरांच्या अहवालानुसार प्रत्युषा गर्भवती होती आणि तिने आत्महत्येच्या काही दिवस अगोदरच स्वत:चा गर्भपात करवून घेतला होता. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार आत्महत्या करण्याच्या काही महिने अगोदर प्रत्युषा बॅनर्जी गर्भवती होती. तसेच तिचा गर्भपातदेखील करण्यात आला होता. मात्र पोलिसांना या मुलाचा पिता कोण होते ? हे सिद्ध करणे कठीण जाणार असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सध्या कोणताच पुरावा हाती नसल्याने डीएनए चाचणी करुन मुलाचे वडील कोण आहेत सिद्ध करणे आव्हानात्मक असेल. प्रत्युषा बॅनर्जीने गर्भपात केला तेव्हा नेमके किती महिने झाले होते याची माहिती मात्र मिळू शकलेली नाही. ‘आम्ही कोणतीही माहिती उघड करु शकत नाही, आम्ही अहवाल पोलिसांच्या हवाली केला आहे’, अशी माहिती जेजे रूग्णालयाचे डीन तात्याराव लहाने यांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत प्रत्युषाच्या गर्भातील पेशींची वाढ होण्यापूर्वीच हत्या करण्यात आल्याचे आढळून आले. याशिवाय, ती गर्भवती असल्याची स्पष्ट लक्षणे आढळून आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Story img Loader