मुंबई : पावसाळी पाण्याचा जलद गतीने निचरा व्हावा यासाठी आतापासूनच उपाययोजना कराव्यात. काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळताच पाणी साचत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाने संबंधित विभाग कार्यालय आणि रस्ते विभाग यांच्याशी समन्वय साधून तातडीने उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे आदेश महानगरपालिका आयुक्त, प्रशासक भूषण गगराणी यांनी गुरुवारी यंत्रणांना दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पावसाळ्यापूर्वी संबंधित कामे पूर्ण होणे गरजेचे असून या कामांदरम्यान नागरिक व प्रवाशांची कुठलीही गरसोय होऊ नये, याची दक्षता घ्यावी. दरम्यान, पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सुरळीत आणि वेगवान होण्यासाठी महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मेट्रो, वाहतूक पोलीस यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी, अशाही सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

हेही वाचा – जळगाव रेल्वे दुर्घटनेत नेपाळी नागरिकांचा मृत्यू

पश्चिम द्रुतगती महामार्गास भेट देऊन गगराणी यांनी गुरुवारी वाहतुकीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी के पूर्व विभागात बैठक घेऊन अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. महानगरपालिका हद्दीतून जाणारा २६ किलोमीटर लांबीचा पश्चिम द्रुतगती महामार्ग खड्डेमुक्त असला तरी रस्त्याची गुणवत्ता अधिक चांगली करावी. पावसाळी पाण्याचा निचरा योग्य प्रकारे करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. द्रुतगती महामार्गावरील रस्ते दुभाजक, पदपथ सुस्थितीत असावेत, असेही आदेश त्यांनी दिले. प्रत्येक विभाग हद्दीत पदपथ, रस्ते दुभाजक, कडठे यांची रचना भिन्न स्वरूपाची आहे. त्यात एकसमानपणा यायला हवा. त्यासाठी रस्ते विभागाने धोरण तयार करून विभाग कार्यालयांनी त्याची अंमलबजावणी करावी,असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, वांद्रे ते दहिसर या पंचवीस किलोमीटर लांबीच्या महामार्गाची गुणवत्ता सुधारण्यास वाव असून काही ठिकाणी पृष्ठीकरण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महामार्गाच्या दुतर्फा सुशोभीकरण करणे शक्य आहे का, याचा आढावा घ्यावा. दुभाजकांमध्ये हिरवळीची लागवड करावी. आवश्यक त्या ठिकाणी पादचाऱ्यांसाठी झेब्रा क्रॉसिंग करावे. ही सर्व कार्यवाही विभाग स्तरावर होणे अपेक्षित आहे, असे गगराणी यांनी नमूद केले.

वाहतूक पोलिसांनी रस्त्यांवर आढळणाऱ्या बेवारस वाहनांची विल्हेवाट लावावी, वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी सूचना कराव्यात. रस्ते विकास कामांना वाहतूक पोलिसांनी ना-हरकत प्रमाणपत्र विनाविलंब द्यावे, दिशादर्शक फलक उभारावेत, अशा सूचनाही गगराणी यांना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

हेही वाचा – Varsha Gaikwad : “कुर्ला भागातील मदर डेअरीची जमीन गौतम अदाणींच्या घशात…”; खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप

या बैठकीत सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे , पोलीस उपआयुक्त मितेश घट्टे, उपआयुक्त उल्हास महाले, उप आयुक्त विश्वास मोटे, सहायक आयुक्त मनीष वळंजू, प्रमुख अभियंता गिरीश निकम यांच्यासह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (एमएमआरडीए) संबंधित अधिकारी उपस्थित होते.