लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिक व गर्भवती महिलांना सामान्यत: प्राधान्य दिले जाते. मात्र केईएम रुग्णालयामध्ये रक्ततपासणी करण्यासाठी येणाऱ्या गर्भवती महिलांना तासन तास रांगेत तिष्ठत उभे राहावे लागते. मधुमेह तपासणीसाठी सकाळी ८ वाजता येणाऱ्या गर्भवती महिलांची ११ ते ११.३० च्या दरम्यान पहिली चाचणी होते. त्यामुळे गर्भवती महिलांना त्रास होण्याची शक्यता आहे. परिणामी, गर्भवती महिलांच्या रक्ततपासणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी उच्च न्यायालयातील वकीलाने केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडे केली आहे.

country first heart liver transplant surgery success led by dr anvay mulay
देशातील पहिली हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी!
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Counseling center for victimized women in Thane district
ठाणे जिल्ह्यात पीडित महिलांसाठी समुपदेशन केंद्र
premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
Kalyan Dombivli Municipal Administration opened modern maternity home in Shaktidham Kolsevadi
कल्याण पूर्वेत ‘शक्तिधाम’मध्ये पालिकेचे पहिले प्रसूतीगृह, महिलांचा कल्याण पश्चिमेतील रुग्णालयात जाण्याचा त्रास वाचला
unknown people beaten up doctor by saying not treating girl properly
ठाणे : मुलीवर व्यवस्थित उपचार केले नसल्याचे म्हणत डॉक्टरला मारहाण
chief officer of mhada nashik board suspended
म्हाडाच्या नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी निलंबित; २० टक्के योजनेतील घरे मिळविण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण

गर्भवती महिलांना नऊ महिन्यांमध्ये वारंवार मधुमेहाची तपासणी करावी लागते. मधुमेहाची तपासणी करण्यासाठी त्यांना सकाळी ९ वाजता बोलविण्यात येते. मात्र केईएम रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून रक्त तपासणीसाठी सकाळी ८ वाजल्यापासून रांगा लावतात. गर्भवती महिलाही रक्त तपासणीसाठी सकाळी ८ वाजल्यापासून रांगेत उभ्या असतात. मधुमेहाची तपासणी करण्यासाठी एक उपाशी पोटी, तर दुसरी खाल्ल्यानंतर चाचणी करायची असते. त्यामुळे गर्भवती महिला सकाळी उपाशीपोटी तपासणीसाठी येतात. मात्र गर्दीमुळे अनेक गर्भवती महिलांची चाचणी ११ वाजता होते. त्यामुळे त्यांना तोपर्यंत उपाशी राहावे लागते. सामान्य रुग्ण व गर्भवती महिला यांच्यासाठी एकच रांग असून गर्भवती महिलांना बराच काळ रांगेत तिष्ठत उभे राहावे लागते. मधुमेहाची चाचणी उपाशीपोटी करायची असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रक्ततपासणीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांकरीता स्वतंत्र व्यवस्था करावी किंवा प्राधान्य देण्यात यावे, अशी विनंती वजा मागणी मुंबई उच्च न्यायालयातील वकील ॲड. सचिन पवार यांनी केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता संगीता रावत यांना पत्र पाठवून केली आहे.

आणखी वाचा-जे.जे. रुग्णालयातील स्त्रीरोग विभागाचे शस्त्रक्रियागृह सोमवारपासून बंद

गर्भवती महिलांसाठी ठरावीक दिवशी बाह्यरुग्ण विभाग सुरू असतो. या दिवशी बहुतांश महिला तपासणीसाठी येतात. त्यावेळी त्यांच्यापैकी काही महिलांना रक्त तपासणीसाठी पाठविण्यात येते. त्यामुळे रक्त तपासणीच्या रांगेत गर्भवती महिलांची संख्या अधिक असते. -डॉ. संगीता रावत, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

Story img Loader