अभिनेत्री प्रिती झिंटा प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी रात्री या प्रकरणातील एक प्रमुख प्रत्यक्षदर्शी तारा शर्मा हिचा जबाब नोंदविला. ताराने नेस वाडिया प्रितीला तीन ठिकाणी शिविगाळ करत असताना पाहिल्याचे सांगितले. तारा किंग्ज इलेव्हन संघाची कर्मचारी असून संघाची तिकीट विक्री आणि पाहुण्यांच्या व्यवस्था पाहण्याचे काम करते. या प्रकरणातील ती स्वतंत्र प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. आपल्या जबाबात तिने तीन ठिकाणी नेस वाडिया प्रितीला शिवीगाळ करत असताना पाहिल्याचे सांगितले. याप्रकरणात नेस वाडियाने त्याच्याकडीन नऊ प्रत्यक्षदर्शींची नावे पोलिसांना सादर केली असून लवकरच त्यांचाही जबाब नोंदविला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader