मारहाणीमुळे झालेल्या जखमा दाखविणारी चार छायाचित्रे अभिनेत्री प्रीती झिंटाने मरीन ड्राईव्ह पोलिसांना बुधवारी सादर केली. नेसने हात पिरगळल्यामुळे उमटलेले वळ या छायाचित्रात दिसत आहेत. ३० मे रोजी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्याच्या वेळी माजी प्रियकर आणि उद्योगपती नेस वाडियाने शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत विनयभंग केल्याचा आरोप अभिनेत्री प्रीती झिंटाने केला होता.
या प्रकरणाचा पुरावा गोळा करण्यासाठी पोलिसांकडून स्टेडियममधील २४० सीसीटीव्ही आणि ९ व्हिडिओ कॅमेऱ्यातील चित्रण पाहिले जात आहे. त्यांना पुरावा सापडला नव्हता. पण प्रीतीने बुधवारी पाठविलेल्या या छायाचित्रामुळे पहिल्यांदाच मारहाणीचा पुरावा सापडला आहे.
आम्ही ही छायाचित्र तपासत असून त्याचा पुरावा म्हणून काही उपयोग होईल का ते पाहत आहोत, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, नेस वाडियानेही त्याच्या बाजूनच्या नऊ साक्षीदारांपैकी ६ जणांचा तपशील पोलिसांना सादर केला आहे.

Preity Zinta Provides Bruise Photos to Police in Ness Wadia

Story img Loader