बेस्ट उपक्रमाने ‘बेस्ट चलो ॲप’आधारित प्रीमियम बस सेवा सुरू केली असून या सेवांना प्रवाशांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर ११ फेब्रुवारीपासून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शहराच्या विविध भागात ही बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. विमानतळावरून दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईसाठी प्रीमियम बस सेवा सुरू करण्यात येणार आहेत.
हेही वाचा >>> गोव्यात कर्निव्हलची लगबग सुरू
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते बॅकबे आगार (दक्षिण मुंबई) आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते खारघर (नवी मुंबई) या बस सेवा सुरू होत आहेत. या बसची संपूर्ण माहिती ‘बेस्ट चलो’ या मोबाइल ॲपमधील ‘चलो बस’ या पर्यायावर उपलब्ध करण्यात आली आहे. सर्व प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेण्याकरिता मोबाइलवर”चलो ॲप’ डाऊनलोड करून या बसमधून प्रवास करावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमाकडून करण्यात आले आहे.