लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मोठमोठ्या मुलाखती आणि चर्चासत्रांऐवजी मोबाइलमधील काही सेकंदांच्या ‘रील्स’वरून आपले मत ठरवणाऱ्या एका मोठ्या वर्गावर सध्या राजकीय पक्ष आणि नेत्यांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि युट्यूब वाहिन्यांवर हजारो-लाखो अनुगामींची (फॉलोअर) संख्या मिरवणारे स्थानिक प्रभावक आणि लोकप्रिय ‘रील्सस्टार’ यांच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. स्थानिक ‘रील्सस्टार’साठी पाच ते २५ लाखांहून अधिक खर्च प्रचारासाठी केला जात आहे.

Image Of Devendra Fadnavis.
Devendra Fadnavis : राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळाचा निर्णय
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Supriya Sule and Pankaja Munde (1)
VIDEO : अजित पवार व्यासपीठावर असताना सुप्रिया सुळे अन् पंकजा मुंडेंची गळाभेट, सुनेत्रा पवार येताच…; व्यासपीठावर नेमकं काय घडलं?
Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील पक्ष सोडणार?
Jitendra Awhad claims Booth captured in Parli alleges Dhananjay Munde
“हत्यारे व गुंडांच्या जोरावर मतदान केंद्र ताब्यात, विरोधी उमेदवार, पोलिसांना दमदाटी”, आव्हाडांनी शेअर केला परळीतला धक्कादायक VIDEO
Shirdi Political Party Convention Venues Coincidence Discussion
शिर्डीस लागती राजकीय पाय! पक्षीय अधिवेशन स्थळांच्या योगायोगाची चर्चा
Jitendra Awhad vs Dhananjay Munde
“परळीत मतदान केंद्रावर शाई लावून बाहेर जायचं, ती गँग बटण दाबायची”, व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा दावा
Sharad Pawar orders to reform party organization within 15 days Mumbai news
पक्षाध्यक्षांसमोर संघटनेचे वाभाडे; १५ दिवसांत पक्ष संघटनेत सुधारणा करण्याचे शरद पवारांचे आदेश

केवळ समाजमाध्यमांवर अवलंबून न राहता जनमानसांत लोकप्रिय असलेल्या माध्यम प्रभावकांना हाताशी धरून प्रचाराचा प्रयत्न राज्यभरात शहर-तालुका-जिल्हास्तरावर सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांवर आशयनिर्मिती करणाऱ्या कलाकारांना एकत्र आणत त्यांना पुरस्कार दिले. त्यानंतर त्यांच्यापैकी मैथिली ठाकूरसारख्या अनेकांनी विविध सरकारी उपक्रमांतर्गत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आपला सहभाग नोंदवत वातावरणनिर्मितीसाठी सहकार्य केले. त्याच धर्तीवर पुण्यात माजी महापौर आणि सध्या भाजपने निवडणुकीच्या रिंगणातील मुरलीधर मोहोळ यांनीही ५०० ते ६०० माध्यम प्रभावकांना एका व्यासपीठावर एकत्र आणले. हाच प्रकार नितेश राणे यांनी ‘कोकण सन्मान’ पुरस्कारांच्या माध्यमातून केला. या कार्यक्रमांमधून सहभागी होणाऱ्या या लोकप्रिय ‘रील्सस्टार’च्या समाजमाध्यमांवरील छायाचित्रे, ध्वनिचित्रफितींच्या माध्यमातून त्यांच्या अनुगामीपर्यंत सहज संदेश देता येतो. मात्र, अनेक नामांकित ‘रील्सस्टार’ थेट एखाद्या राजकीय पक्षाचा प्रचार करणे टाळतात, असे ‘कॉन्सेप्ट पीआर’चे कार्यकारी संचालक सुनील नायर यांनी सांगितले.

आणखी वाचा-बुलेट ट्रेनच्या डेपोमध्ये सौरऊर्जेचा वापर करणार; ठाणे, साबरमतीमध्ये अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पाची उभारणी

सध्या तीन प्रकारचे माध्यम प्रभावक प्रचाराच्या या रणधुमाळीत कार्यरत आहेत. काहीजण कट्टर पक्ष कार्यकर्ते आहेत. काही माध्यम प्रभावक कोणा एका उमेदवाराची वा पक्षाची बाजू घेत नाहीत, मात्र ते एखाद्या पक्षाच्या ध्येयधोरणांची, विचारधारेची प्रशंसा वा टीका करतात. त्यासाठी ते मानधन घेतात. तर काही मुळात राजकीय प्रभावक आहेत जे सातत्याने राजकीय घटनांबद्दल व्यक्त होत असतात, त्यावर स्वत:चे मत मांडताना दिसतात. प्रभावकांची निवड करताना स्थानिक पातळीवरील लोकप्रिय चेहऱ्यांचा अधिक विचार केला जातो, असे नायर यांनी सांगितले.

सध्या वऱ्हाडी भाषेत संवाद साधणारी नेहा ठोंबरे, कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर, नांदेडची आत्याबाई कल्पना खानसोळे, करण सोनवणे, सिद्धांत सरफरे, समीक्षा टक्के अशा अनेक लोकप्रिय स्थानिक कलाकारांना मागणी आहे. छोट्या-छोट्या चित्रफितींमधून गंमतीशीर वा उपहासात्मक पद्धतीने मिळणारा आशय लोकांना हल्ली अधिक आकर्षित करतो. त्यातही स्थानिक युट्यूब वाहिन्यांच्या माध्यमातून त्या परिसरातील उमेदवार, राजकीय घटनांची माहिती अधिक घेतली जाते. त्यामुळे अशा वाहिन्यांच्या चित्रफिती, पोस्ट, मुलाखती यातून हळूहळू लोकांचे मतपरिवर्तन केले जाते, अशी माहिती या क्षेत्रात कार्यरत असलेल्या रिओ वन डिजिटल’चे सहसंस्थापक प्रशांत जाधव यांनी दिली.

आणखी वाचा- मध्य रेल्वेच्या आरपीएफने एका तिकीट दलालाला पकडले, ३८ हजार रुपयांची १४ इ-तिकिटे ताब्यात

लोकप्रियतेवर भर

अॅक्शन मुंबई, मुंबई मेट्रो, मुंबई टीव्हीसारख्या अनेक स्थानिक युट्यूब वाहिन्या लोकप्रिय आहेत. या यूट्यूब वाहिन्यांचे अनुगामी किती आहेत? तसेच एखाद्या प्रभावकांची लोकप्रियता, त्याच्या इन्स्टाग्राम, फेसबुक अशा विविध माध्यमांवर असलेले अनुगामी या सगळ्यांचा विचार करून त्यासाठी पैसे दिले जातात. स्थानिक पातळीवरील लोकप्रिय प्रभावकांसाठी पाच ते सहा लाख रुपये मोजले जातात. तर ‘रील्स’ची निर्मिती, संकल्पना, प्रचार, फेसबुक-व्हॉट्सअप, एक्सवरील पोस्ट-रिपोस्ट या सगळ्याचा विचार करून २५ लाखांहून अधिक खर्च केला जातो.

Story img Loader