मुंबई: मतदार यादीतील चुकीची नावे, अपूर्ण आणि चुकीचे पत्ते यामुळे मतदानाच्या टक्केवारीत होणारी घट दूर करण्यासाठी आगामी महापालिका, नगरपालिका निवडणुकीसाठी अचूक मतदार याद्या तयार करण्याची मोहीम राबविण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांना दिले आहेत. महापालिका, जिल्हा परिषदा तसेच नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका लवकरच होणार आहेत. या निवडणुकीसाठी विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांवरून प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान व मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी हे आदेश दिले. दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीस राज्यभरातील जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त तसेच राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर उपस्थित होते.
महानगरपालिका निवडणुकांसाठी अचूक मतदार याद्या तयार करा!; राज्य निवडणूक आयोगाचे पालिकांना आदेश
महापालिका, जिल्हा परिषदा तसेच नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका लवकरच होणार आहेत.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-11-2022 at 01:20 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prepare accurate voter lists municipal elections state election commission orders to municipalities ysh