सिद्धेश्वर डुकरे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई: लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसोबत विधानसभेची निवडणूक घेण्याची वेळ आली तर ही जबाबदारी योग्य रीतीने पार पाडण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयाने तयारी सुरू केली आहे. आवश्यक तेवढी मतदान यंत्रे मिळविण्यावर आतापासूनच भर देण्यात आला आहे.
लोकसभेच्या २०२४ मधील सार्वत्रिक निवडणुकीला जेमतेम एक वर्षांचा कालावधी शिल्लक राहिला असून राज्य निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयाने दोन्ही निवडणुका एकाच वेळी पार पाडण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. भारत निवडणूक आयोगाकडे आजघडीस १२ लाखांच्या आसपास मतदान यंत्रे उपलब्ध आहेत. लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्राच्या (बूथ) संख्येनुसार ईव्हीएमची आवश्यकता भासते.
साधारणत: १५०० मतदारांसाठी एक मतदान केंद्र अशी राज्यात रचना आहे. राज्यात एक लाख १२ हजार इतकी बूथची संख्या आहे. यासाठी मतपत्रिका युनिट (बॅलेट युनिट) आणि नियंत्रण (कंट्रोल युनिट) यासह मतदान पडताळणी छापील लेखा दर्शक (व्हीव्हीपॅट) यांची आवश्यकता लागते. एका बूथसाठी प्रत्येकी दोन बॅलेट युनिट व प्रत्येकी एक कंट्रोल युनिटची गरज लागते. तसेच साधारण २५ टक्क्यांच्या आसपास एवढय़ा संख्येने ईव्हीएम राखीव ठेवावी लागतात. याची एकूण संख्या विचारात घेतली तर राज्यासाठी ३ लाख ५० हजार इतक्या मतदान यंत्रांची गरज लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीसाठी भासेल.
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे कार्यालय इतक्या संख्येने मतदान यंत्रे मिळवण्यासाठी तयारीला लागले आहे. निवडणूक याचिका निकालात निघाल्या असल्यास तेवढी मतदान यंत्रे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
लोकसभा वा विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी अजून काहीही संकेत नाहीत. मात्र आमच्या कार्यालयातील कामाचा भाग म्हणून आम्ही सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. – श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र