मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्यावर अनेक ‘बेकायदा कामे’ करण्यासाठी दबाव आणला. तसेच ही कामे कधी पवार, तर कधी पाटील साहेबांनी करायला सांगितल्याचे सांगून देशमुख हे आपल्यावर दबाव आणत. पवार साहेब नेमके कोण, हे विचारण्याची आपली कधी हिंमत झाली नाही, असा दावा बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात केला आहे. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाझे यांनी हे पत्र सोमवारी विशेष न्यायालयात सादर केले. तसेच आवश्यक त्या कारवाईची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – भरत गोगावले यांची याचिका विलंबाच्या उद्देशाने, ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांचा उच्च न्यायालयात दावा

हेही वाचा – सीमाशुल्क संगणकीय यंत्रणेद्वारे १२ कोटींच्या कर परतावा पावत्यांचा अपहार

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटालिया या निवासस्थानाबाहेरील स्फोटके प्रकरणासह अन्य काही प्रकरणांत वाझे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. फडणवीस यांना ३० जुलै रोजी लिहिलेले पत्र वाझे यांनी सोमवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. यू. कदम यांच्यासमोर सादर केले. या पत्रात देशमुख यांच्या कार्यकाळात गृह खात्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट झाला होता. आपणही त्याचे बळी ठरलो आहोत. देशमुख यांनी आपल्यावर दबाव टाकून आपल्याला अनेक बेकायदा कामे करण्यास भाग पाडले. पाटील साहेबांकडून हे काम आले आहे असे सांगून देशमुख आपल्याकडून अशी कामे करून घेत, असा दावा वाझे यांनी पत्रात केला आहे. देशमुख यांनी मोठे पवार साहेब आणि पाटील साहेब या नावाने अनेकांवर दबाव टाकून त्यांच्याकडून कामे करून घेतल्याचेही वाझे यांनी म्हटले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pressure from anil deshmukh to do illegal work letter written to devendra fadnavis submitted by sachin waze in special court mumbai print news ssb
Show comments