अचूक वेळेचे भान आणून देणारे घडय़ाळ ही काही वर्षांपूर्वी चैनीची बाब होती. काही मोजक्या लोकांकडे घडय़ाळ असे. त्यामुळे रस्त्यात एखाद्याने ‘किती वाजले’ असा प्रश्न विचारला की, ती व्यक्ती अगदी रुबाबात मनगटावरील तबकडीत डोकावून वेळ सांगत असे. आता तो जमाना कधीच मागे पडला. कारण प्रत्येकाच्या मुठीत आलेल्या स्मार्टफोनच्या जमान्यात वेळ सांगण्यासाठी स्वतंत्र घडाळ्याची फारशी आवश्यकता राहिलेली नाही. मात्र काळानुरूप आपल्या अवतारात बदल केलेल्या घडाळ्यांनी फॅशन म्हणून मनगटावरील आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. घडय़ाळ शोभेचे आणि प्रतिष्ठेचे लक्षण बनले आहे. अनेक तरुण-तरुणी पेहेरावानुसार मनगटावरील घडय़ाळे बदलतात.

सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाचे जीवन हे घडय़ाळांच्या काटय़ावर चालत असते. मोबाइलचे आगमन होण्यापूर्वी मनगटावरील या गोल,चौकोनी तबकडीला पर्याय नव्हता. अगदी पाचवी-सहावीपासून मुलांना घडय़ाळाचे आकर्षण असायचे. मात्र अनेक कुटुंबांत मुलांचा हा हट्ट दहावीत पूर्ण केला जात असे. ‘तुला दहावीत गेल्यावर घडय़ाळ घेईन’ असे आश्वासन पालक मुलांना देत असत. मागच्या पिढीतील अनेकांनी दहावीच्या परीक्षेला सर्वप्रथम मनगटावर घडय़ाळ बांधले. काही जणांना दहावीची परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर बक्षीस म्हणून घडय़ाळ मिळत असे. पालकांकडून घडय़ाळाची बक्षिसी मिळालेली मुले-मुली मग इतर मित्र-मैत्रिणींमध्ये भाव खात. थोडक्यात त्या काळातही मुले वेळ पाहण्यापेक्षा फॅशन म्हणूनच घडय़ाळाचा वापर करीत होती.

Morning dizziness reason
सात-नऊ तासांची झोप पूर्ण होऊनही तुम्हाला सकाळी थकवा जाणवतो?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Bride beautiful dance
‘नवरीने वरात गाजवली…’ स्वतःच्या लग्नात घोड्यावर बसून केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Vinayak Raut statement regarding those working against parties Ratnagiri news
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बेईमान पदाधिका-यांवर कारवाई होणार; शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांची माहिती
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
tharla tar mag monika dabade baby shower ceremony
‘ठरलं तर मग’च्या सेटवर मोनिकाचं डोहाळेजेवण; मालिकेतील सर्व अभिनेत्री ऑफस्क्रीन आल्या एकत्र, पती उखाणा घेत म्हणाला…
ladies group dance on marathi song kakhet kalasa gavala valsa kashala marathi old song video goes viral
“काखेत कळसा गावाला वळसा कशाला?” जुन्या मराठी गाण्यावर महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “नाद पाहिजे फक्त”
amaltash movie
सरले सारे तरीही…

आता घडय़ाळ कोणत्याही मोबाइलचा अविभाज्य घटक असल्याने मनगटावरील त्याचे स्थान काहीसे डळमळीत झाले आहे. आता जो-तो वेळ पाहण्यासाठी लगेच खिशातून मोबाइल काढतो. असे असले तरी युवकांच्या मनगटावर घडय़ाळही असतेच. त्यातही साध्या घडय़ाळांची जागा आता महागडय़ा स्पोर्टी वॉचने घेतल्याचेही दिसून येते. यामुळे फॅशनच्या नावाखाली महागडी घडय़ाळे वापरण्याचा ट्रेंड मुला-मुलींमध्ये निर्माण झाला आहे. यामुळे विविध प्रकारच्या घडय़ाळांना आजही बाजारात मागणी असल्याचे चित्र आहे.

ब्रेसलेट आणि बँगल स्टाइल वॉच

एखाद्या पार्टीसाठी जाताना रिस्ट वॉच घालावे की ब्रेसलेट अशी मनाची द्विधा मन:स्थिती असेल तर अशा वेळी ब्रेसलेट आणि बँगल स्टाइल वॉच उत्तम पर्याय ठरते. हा एक स्मार्ट चॉइस आहे. यामुळे ब्रेसलेटचा लुक तर मिळतो पण वॉचचे पूर्ण फायदेही मिळतात. तरुणींमध्ये ब्रेसलेट वॉच लोकप्रिय असण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्याची किंमत त्यांच्या पॉकेटमनीमध्ये वसूल होते.

महागडय़ा घडय़ाळ्यांना पसंती

मोबाइलमुळे घडय़ाळांच्या व्यवसायात काय फरक पडला याविषयी विक्रेत्यांना विचारले असता फारसा फरक पडला नसल्याचे त्यांनी सांगितले. मोबाइलच्या वाढत्या प्रमाणामुळे सुरुवातीला काही काळ याचा परिणाम जाणवला; पण आता तर महागडय़ा आणि स्पोर्टी वॉचच्या फॅशनची जादू तरुणांना अधिक भावते. त्यामुळे हा उद्योग आणखी वाढल्याचे विक्रेते सागंतात.

स्वस्त घडय़ाळांनाही मागणी 

सध्या बाजारांमध्ये फर्स्ट कॉपी म्हणजे काही बडय़ा ब्रॅण्डेस्ची नक्कल केलेली घडय़ाळे मोठय़ा प्रमाणात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. घडय़ाळ हे जरी प्रतिष्ठेचे लक्षण असले तरी ते खिशाला मोठी फोडणी देणारे ठरते. त्यामुळे अशा प्रकारची दुधाची तहान ताकावर भागविणारी घडय़ाळेही फॅशनप्रेमींना आवडतात. अतिशय स्वस्त दरांमध्ये ही घडय़ाळे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. ‘यूज अ‍ॅण्ड थ्रो’ अशा प्रकारची ही घडय़ाळे असतात. त्यामुळे फॅशन म्हणून मुले या घडय़ाळांवर वेळ निभवून नेत असल्याचेही दिसून येते.

मुलांचा एकमेव दागिना

फॅशन म्हटली की, मुली वापरत असलेल्या एकाहून एक बाबी समोर येतात. त्या तुलनेत मुलांकडे फॅशनच्या नावाखाली घडय़ाळ हा एकमेव पर्याय असतो. लग्नकार्यातही ही बाब प्रकर्षांने जाणवते. महागडे मोबाइल असतानाही दुचाकीवर वेळ बघायला घडय़ाळ हवेच, असे युवक सांगतात. त्यातही नवनवीन डिझाइनला पसंती असते. काही घडय़ाळांची डिझाइन्स इतकी गुंतागुंतीची असते, की नीट निरखून पाहिल्याशिवाय वेळ दिसत नाही. तरीही ‘दिसायला चांगले’ म्हणून अशी घडय़ाळे पसंत केली जातात.

मुलींना रुंद घडय़ाळांची भुरळ

ट्रेण्डी लुक येण्यासाठी फॅशनवेडय़ा तरुणी सध्या मोठय़ा डायलच्या आणि रुंद बेल्ट असलेल्या रिस्टवॉचना पसंती देत आहेत.

बारीक लेदर बेल्टच्या, छोटय़ा, छोटय़ा गोल्डन चेनच्या नाजूक डायलच्या घडय़ाळांची फॅशन सध्या ‘आऊट’ आहे. अनेकदा मोठे डायल महिलांच्या मनगटापेक्षाही मोठे असते. नाजूक मनगटावर मोठे घडय़ाळ एक वेगळा लुक देते. मोठे डायल असणारी घडय़ाळे तरुणींच्या हातावर मॉडर्न आणि आकर्षक दिसतात. मोठय़ा डायलचे आणि रुंद बेल्ट असलेले फॅशनेबल घडय़ाळ वापरणाऱ्या नव्या जमान्यातील युवतींच्या म्हणण्यानुसार, अशी घडय़ाळे आत्मविश्वास वाढवतात आणि व्यक्तिमत्त्व चांगल्या प्रकारे खुलवतात. यामध्ये गोल्डन, रेड गोल्ड, सिल्व्हर असे विविध पर्याय उपलब्ध आहेत.

रोज गोल्ड वॉच

फॉर्मल घडय़ाळांमध्ये हा प्रकार म्हणजे सर्वात एलिगंट चॉईस होय. रोज गोल्डचा लुक आणि फिल या घडय़ाळांना फारच सुंदर बनवतो. सिल्व्हर आणि गोल्ड प्लेटेड घडय़ाळांचा ज्यांना कंटाळा आला आहे, ते रोज गोल्ड वॉच निवडू शकतात. ही घडय़ाळे पूर्णपणे रोज गोल्डच्या कोटिंगमध्ये उपलब्ध आहेत.

डय़ुअल कलर्ड रिस्ट वॉच

अशा प्रकारची घडय़ाळे दिसायला साधी असली तरी अतिशय स्टायलिश लुक देतात. यामध्ये अनेक प्रकार आहेत. गोल्ड आणि सिल्व्हर, सिल्व्हर आणि रोज गोल्ड, व्हाइट मेटल आणि गोल्ड आदी प्रकार यामध्ये उपलब्ध आहेत. या घडय़ाळांची रंगसंगती इतकी सुंदर आहे की ते सर्व प्रकारच्या कपडय़ांवर खुलून दिसते.

गनमेटल वॉच

आत्मविश्वास असणाऱ्या महिलांसाठी हे घडय़ाळ योग्य ठरते. ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठीही हा एक चांगला पर्याय आहे. पुरुषांमध्ये हा प्रकार लोकप्रिय आहे. ग्रे रंगाचे फिनिश या घडय़ाळांना अतिशय एलिगंट आणि आकर्षक बनवते.

  • किंमत- साधरणत: स्ट्रीट मार्केटमध्ये २०० रुपयांपासून ते ५००पर्यंत घडय़ाळे मिळतात. ब्रॅण्डेड घडय़ाळ्यांची किंमत त्या त्या ब्रॅण्डवर अवलंबून असते.
  • कुठे- मुंबईमधील मोठय़ा मॉल्समध्ये ब्रॅण्डेड घडय़ाळांची आऊटलेटस् आहेत. तसेच कुलाबा कॉजवे, बांद्रा िलक रोड, लोखंडवाला मार्केट यांसारख्या बाजारपेठांमध्ये घडय़ाळांचे अनेक प्रकार फॅशनप्रेमींसाठी उपलब्ध आहेत.

Story img Loader