मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ऑक्टोबर २०२४ च्या सोडतीतील पुनर्विकासाअंतर्गत उपलब्ध झालेल्या ३७० घरांच्या किमतीत १० ते २५ टक्क्यांची कपात करून म्हाडाने अर्जदारांना दिलासा दिला. मात्र, त्याचवेळी ३७० पैकी अल्पगटातील १४ घरांच्या किमती २० टक्क्यांनी कमी होण्याऐवजी १२ ते १३ लाख रुपयांनी वाढल्या.

मुंबई मंडळातील अधिकाऱ्यांनी घरांच्या किमती निश्चित करताना घातलेल्या घोळाचा फटका इच्छुक, अर्जदारांना बसणार आहे. या १४ घरांसाठी चुकीच्या शीघ्रगणकानुसार (रेडी रेकनर) किमती निश्चित करण्यात आल्या. त्यामुळे अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेस काही दिवस शिल्लक असताना किमतीत बदल करण्याची नामुष्की मंडळावर आली. या घरांच्या सुधारित किमती मंडळाने जाहीर केल्या आहेत.

maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
HDFC Bank loan rate hike installment of home loan car loan increase print eco news
एचडीएफसी बँकेच्या कर्जदरात वाढ; तुमच्या गृह कर्ज, वाहन कर्जाचा हप्ता वाढणार काय?
Redevelopment is essential for safety middle class citizen Lands freehold
सुरक्षिततेसाठी पुनर्विकास अपरिहार्य
swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?

हे ही वाचा…गोष्ट मुंबईची! भाग १५३ : इन्फोसिसच्या नावाची चर्चाही झाली याच गणपतीच्या साक्षीनं!

मुंबई मंडळाला म्हाडा वसाहतीच्या ३३ (५) अंतर्गत पुनर्विकासाद्वारे आणि उपकरप्राप्त इमारतींच्या ३३ (७) अंतर्गत पुनर्विकासाद्वारे २०२४ च्या सोडतीसाठी ३७० घरे उपलब्ध आहेत. उपलब्ध घरांच्या किमती या नियमानुसार त्या त्या परिसरातील शीघ्रगणक दराच्या ११० टक्के दराने निश्चित करण्यात येतात. मात्र, या घरांचे क्षेत्रफळ, उत्पन्न गट आणि घरांच्या किमती यात तफावत असल्याने घरे महाग झाली आहेत. त्यामुळे यावरून म्हाडावर मोठी टीका होत होती. अल्प गटातील घर पावणेतीन कोटी रुपयांच्या घरात गेले होते. यावरून झालेली टीका लक्षात घेऊन म्हाडा प्राधिकरणाने घरांच्या किंमती उत्पन्न गटानुसार १० ते २५ टक्क्यांची कपात केली. त्यानुसार ३७० घरांच्या किंमतीत घट झाली असून नवीन किंमती म्हाडाच्या सोडतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. असे असताना या ३७० घरांपैकी कुर्ल्यातील संकेत क्रमांक ४९५ मधील अल्प गटातील स्वानंद प्रकल्पातील १४ घरांच्या किमती नियमानुसार २० टक्क्यांनी कमी होणे अपेक्षित होते.

५८ लाख ६३ हजार रुपये किंमत

‘स्वानंद’ प्रकल्पातील १४ घरांसाठी ४३ लाख ९७ हजार ९५९ रुपये आणि ४५ लाख ४० हजार २०० रुपये अशा किमती निश्चित करण्यात आल्या होत्या.

हे ही वाचा…Cyber scam: व्हिडीओ कॉलवर महिलेला विवस्त्र होण्यास सांगितले; मग पैसे उकळले, कोणती भीती दाखवून होते सायबर फसवणूक?

म्हाडा प्राधिकरणाच्या २८ ऑगस्टच्या निर्णयानुसार या घरांच्या किमतीत २० टक्क्यांनी कपात होईल, अशी आशा या घरांसाठी अर्ज भरलेल्यांना तसेच अर्ज भरू इच्छिणाऱ्यांना होती.

किमतीत कपात होण्याऐवजी २ सप्टेंबरला या किमतीत १२ ते १३ लाख रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे ४३ लाख ९७ हजार ९५९ रुपये असलेली घराची किंमत ५६ लाख ७९ हजार ३१३ रुपये झाली आहे. तर ४५ लाख ४० हजार २०० रुपयाला असलेल्या काही घरांची किंमत आता ५८ लाख ६३ हजार २६३ रुपये झाली आहे.

हे ही वाचा…घाटकोपरमधील इमारतीला भीषण आग, १३ जण गुदमरले; रुग्णालयात उपचार सुरू

चुकीचे दर

मुंबई मंडळाच्या शुद्धीपत्रानुसार या घरांच्या किंमती २०२४-२५ च्या शीघ्रगणकानुसार निश्चित करण्यात आल्या. मात्र चुकीचे शीघ्रगणकाचे दर आकारण्यात आले. १ लाख २५ हजार १७० रुपये प्रति चौरस मीटर याप्रमाणे दर निश्चित करणे आवश्यक असताना संबंधित अधिकाऱ्याने ८५ हजार २९४ प्रति चौरस मीटर दराने त्या निश्चित करण्यात आल्या. रिषद कामवाटप ऑनलाइन