दिवाळीनंतर डाळी, तसेच कडधान्यांचे दर कडाडले असून होळीपर्यंत डाळी, कडधान्याचे दर ‘जैसे थे’ राहणार असल्याचा दावा वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (एपीएमसी) घाऊक व्यापाऱ्यांनी केला आहे. सध्यस्थितीत कडधान्ये आणि डाळींचे दर शंभरीपार गेले आहेत. यामुळे डाळ, कडधान्ये विकत घेताना सर्वसामान्यांना हात आखडता घ्यावा लागत आहे. होळीनंतर बाजारात नवीन उत्पादन येण्यास सुरुवात होईल आणि त्याबरोबरच डाळी, कडधान्यांचे भाव कमी होतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

दिवाळीनंतर बाजारात नवीन पिकांचे उत्पादन येण्यास सुरुवात होते. यंदा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारात दिवाळीनंतर तुलनेत डाळी, कडधान्यांची कमी आवक झाली आहे. किरकोळ बाजारात मागणी जास्त आणि पुरवठा कमी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे किरकोळ बाजारात कडधान्ये व डाळींचे दर कडाडले आहेत.

ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड

हेही वाचा – Video: “कशाला स्वत:ची अब्रू…”, ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!

कडधान्यांपैकी एक असलेला वाल सध्या सर्वाधिक २०० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याचा दर १५० रुपये प्रतिकिलो होता. आवक कमी झाल्यामुळे काही व्यापाऱ्यांकडे पांढरे वाल उपलब्ध नाहीत. दहा ते पंधरा दिवसांत गुजरात, मध्य प्रदेश आणि अलिबाग येथून वालाची आवक सुरू झाल्यानंतर त्याचे दर कमी होतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

कडधान्ये प्रतिकिलो (रुपये)

मटकी – ९० ते ११० रुपये

काबोली चणा – १२० ते १५६ रुपये

वाल – १८० ते २०० रुपये

चवळी मोठी – १०५ ते १३० रुपये

चवळी लहान – १५६ ते १६० रुपये

मूग – १०४ ते १२० रुपये

डाळी प्रतिकिलो (रुपये)

उडीद डाळ – १०४ ते १२० रुपये

मूगडाळ – १०२ ते १२० रुपये

तूरडाळ – १०० ते १२५ रुपये

ऑनलाइन किराणाविषयक ॲपवरही डाळी, कडधान्ये महागली

ऑनलाइन किराणाविषयक ॲपवर उपलब्ध असणाऱ्या डाळी, कडधान्यांचे दर बाजारातील दरापेक्षा अधिक आहेत. ऑनलाइन किराणाविषयक ॲप सोयीस्कर असले तरी बाजार आणि ॲपवरील डाळी, कडधान्यांच्या दरात तफावत असल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा – “मुख्यमंत्र्यांना गल्ली-गल्लीत फिरायला लावणार” म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना शिंदे गटाचं प्रत्युत्तर; म्हणाले, “गल्लीत फिरणे म्हणजे…”

प्रतिक्रिया

बाजारात नवीन आवक सुरू होईपर्यंत आताचे दर असेच राहणार आहेत. नवीन उत्पादन येण्यास सुरुवात झाली की, आपोआप दर कमी होतील. होळीनंतर बाजारात नवीन उत्पादनाची आवक सुरू होईल, असे व्यापारी गजानन मेहतर म्हणाले.