मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शुक्रवारपासून राज्यात दौरा करणार आहेत. मोदी यांच्या राज्यात १० सभांचे आयोजन सहा दिवसांत करण्यात आले आहे. मुंबईतील सभा १४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

मोदी यांची विधानसभा निवडणूक प्रचाराची पहिली सभा धुळे येथे दुपारी १२ वाजता होणार असून दुसरी सभा नाशिक येथे २ वाजता होईल. मोदी यांची ९ नोव्हेंबरला अकोला व नांदेड, १२ नोव्हेंबरला चिमूर, सोलापूरला सभा होणार असून पुण्यात रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, रायगड आणि मुंबईत शिवाजी पार्क येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. शहा यांच्या शुक्रवारी शिराळा (सांगली), कराड, सांगली आणि कोल्हापूर येथे चार सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

Story img Loader