मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांमध्ये राज आणि योग यांचा योग्य संगम आहे. त्यामुळे ते राजयोगी आहेत. त्यांच्या जीवनचरित्रावरील चित्रपटामुळे तरुणांना प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पी. एम. नरेंद्र मोदी’ चित्रपटाच्या पोस्टरचे प्रदर्शन करताना व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या वेळी मुख्यमंत्र्यांनी निर्माते सुरेश ओबेरॉय आणि संदीप सिंग, दिग्दर्शक ओमांग कुमार आणि अभिनेता विवेक ओबेरॉय यांचे कौतुक केले. हा चित्रपट नव्हे तर एक विचार आहे, असे सहनिर्माते संदीप सिंग म्हणाले. या चित्रपटात वयाच्या ७ व्या वर्षांपासूनचा पंतप्रधानांचा प्रवास उलगडण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक ओमांग कुमार यांचा मेरी कोम, सरबजीत, भूमी या चित्रपटानंतरचा चौथा चित्रपट आहे. चित्रीकरण सुरू असून २०१९ मधील जुलै-ऑगस्ट दरम्यान प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

मराठीत पोस्टर नाही..

‘पी.एम. नरेंद्र मोदी’ हा २३ भाषांमध्ये प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट ठरणार आहे. एखाद्या पंतप्रधानांची कारकीर्द सुरू असताना त्यांच्यावर चित्रपट बनणे हा इतिहासही या चित्रपटाने रचला आहे. मात्र, पोस्टर प्रदशर्नावेळी व्यासपीठामागे लावण्यात आलेल्या पाच पोस्टरमध्ये गुजराती, हिंदूी, इंग्रजी, उर्दू, तमिळ या भाषांना स्थान देण्यात आले होते. मुंबईत हा सोहळा पार पडला आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोस्टर प्रदर्शित होऊनही मराठीला स्थान देण्यात आले नव्हते.