पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षीपासून सुरू झालेल्या ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले आहेत. सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेसाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. त्यानंतर आज(रविवार) मुंबईतील षण्ङमुखानंद सभागृहात हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उषा मंगेशकर, आशा भोसले, आदिनाथ मंगेशकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, भाजपा नेते विनोद तावडे आदींची उपस्थिती होती.
याचबरोबर उत्कृष्ट संगीत कारकीर्दीसाठी गायक राहुल देशपांडे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. तर सिनेमातल्या कारकिर्दीसाठी अभिनेत्री आशा पारेख आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सामाजिक कार्यासाठी आनंदमयी पुरस्कार नुतन मुंबई टिफीन चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे मुंबईच्या डब्बेवाल्यांना जाहीर झाला असून संध्याछाया या नाटकासाठी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि निर्माते श्रीपाद पद्माकर यांनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत.