ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन दुसऱ्यांदा भारतभेटीवर येत असून सोमवारी सकाळी त्यांचे मुंबईत आगमन होत आहे. आपल्या तीन दिवसांच्या भारतभेटी दरम्यान कॅमेरॉन सोमवारी सकाळी हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीच्या मुंबईतील मुख्यालयाला भेट देतील. त्यानंतर ते दुपारी ताज पॅलेस हॉटेलमध्ये काही नामवंत उद्योगपतींना भेटणार आहेत. तसेच सेंट झेवियर्स शाळेलाही कॅमेरॉन भेट देणार आहेत, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने पत्रकात दिली आहे. सोमवारच्या मुंबई भेटीनंतर ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन सायंकाळी नवी दिल्लीला रवाना होणार असून त्यांच्यासोबत विविध विद्यापीठांचे कुलगुरू, ब्रिटनचे उच्चपदस्थ अधिकारी व काही उद्योगपती असतील.
२०१० साली ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर लगेचच मे महिन्यात कॅमेरॉन पहिल्यांदा भारतभेटीवर आले होते. आता दुसऱ्या भेटीत ते मुंबईतील एका खाजगी कार्यक्रमालाही उपस्थित राहणार असल्याची माहिती उद्योग क्षेत्राकडून देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा