शिवसेनेतील भांडणे व लाथाळ्यांच्या संदर्भात यापुढे सर्वच शिवसेना नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी मंगळवारी सांगितले.
शिवसेना अथवा कोणत्याही पक्षातील वाद हे प्रासंगिक असतात. एखाद्या बैठकीत एखादी गोष्ट घडल्यास त्याला किती महत्व द्यायचे हे आपल्यावर अवलंबून आहे. अशा घटना पक्षापक्षांत घडतच असतात. त्या घटनांमुळे आत्मपरीक्षण जरूर करावे, मात्र याचा अर्थ शिवसेनेत काही वेगळे घडते आहे असे नाही, असे मनोहर जोशी यांनी आज प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. छोटी छोटी नाराजी असते. छोटी छोटी भांडणे असतात, पण शिवसेना पुन्हा एकजुटीने उभी राहाते, असेही ते म्हणाले. कोणतीही छोटी नाराजी मी गंभीरच समजतो. पण त्यामुळे शिवसेनेत काही चिंतेचे वातावरण आहे असे मात्र मला वाटत नाही.

Story img Loader