अंधेरी पूर्वेच्या औद्योगिक वसाहत भागात असलेल्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुख्याध्यापकाने पहिलीतील एका मुलाचे लैंगिक शोषण करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात या मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंधेरी पूर्व येथील पूनम नगर येथे असलेल्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील पहिलीत शिकणारा हा विद्यार्थी ३१ ऑगस्ट रोजी शाळेच्या प्रसाधनगृहात गेला. त्या वेळी शाळेचे मुख्याध्यापकही त्या मुलापाठोपाठ प्रसाधनगृहात गेले. तेथे त्यांनी या मुलाचे लैंगिक शोषण केले. घाबरलेल्या या विद्यार्थ्यांने घरी आल्यावर घडला प्रकार आपल्या पालकांना सांगितला.