रेल्वेमंत्र्यांच्या चलाखीची मुंबईकरांना झळ
मुंबईतील उपनगरी प्रवाशांना रेल्वे भाडेवाढीचे ‘११ चे १० पण १२ चे १५’ हे सूत्र लागू होणार असले, तरी प्रत्यक्षात अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात पैसे मोजावे लागणार आहेत. ३१ डिसेंबपर्यंत असलेल्या तिकीटदरांच्या तुलनेत २२ जानेवारीपासून लागू होणाऱ्या नव्या दरवाढीच्या तक्त्यानुसार ठाणे-सीएसटी प्रवासासाठी ९ रुपयांऐवजी १५ रुपये, कल्याण-सीएसटी प्रवासासाठी १३ रुपयांऐवजी २० रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच बोरिवली-चर्चगेट या प्रवासाला ९ रुपयांच्या जागी १५ रुपये मोजावे लागणार आहेत. ‘प्रतिकिलोमीटर २ पैसे’ एवढीच दरवाढ केल्याची चलाखी रेल्वेमंत्री पवन बन्सल यांनी केली असली, तरी मुंबईकरांना त्याचा जोरदार डंख २२ जानेवारीपासून बसणार आहे. नव्या सूत्रानुसार होत असलेल्या भाडेवाढीचा अधिकृत तक्ता मंगळवारी जाहीर करण्यात आला.रेल्वेमंत्र्यांनी उपनगरी भाडय़ाच्या दुसऱ्या वर्गामध्ये प्रतिकिलोमीटर दोन पैशांची केलेली वाढ ही प्रत्यक्षात १ जानेवारीला झालेल्या भाडेवाढीनंतरही आणखी वाढत आहे. मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पाचा अधिभार १० किमीच्या पुढील प्रवासाच्या भाडय़ावर लावण्यात येत होता. पण, छत्रपती शिवाजी टर्मिनस ते भायखळा या पाच किमीच्या प्रवासाचे भाडेही पाचच्या पटीतील पूर्णाकात करताना एक रुपयाने वाढविण्यात आले आहे. याचाच अर्थ किमान भाडय़ापासूनच एक रुपयाची वाढ करण्यात आली आहे. ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यानचे मूळ भाडे १० रुपये दाखविण्यात आले असून, त्यावर अधिभाराचे तीन रुपये आकारून व पुढे पूर्णाकात करताना आणखी दोन रुपये वाढ करण्यात आली आहे.
 उपनगरी रेल्वे भाडेवाढ तक्ता
प्रथम वर्गाचे भाडे पुढीलप्रमाणे
स्थानके        नवे भाडे
सीएसटी-भायखळा    ५०
सीएसटी-दादर    ५०
सीएसटी-कुर्ला    ९०
सीएसटी-घाटकोपर    ९०
सीएसटी-ठाणे    १२०
सीएसटी-डोंबिवली    १४०
सीएसटी-कल्याण    १४५
सीएसटी-कर्जत    १९५
सीएसटी-कसारा    २१०
सीएसटी-खोपोली    २०५
सीएसटी-वाशी    १२५
सीएसटी-बेलापूर    १२५
सीएसटी-पनवेल    १४५

प्रथम वर्गाचे भाडे पुढीलप्रमाणे
स्थानके        नवे भाडे
चर्चगेट-मुंबई सेंट्रल    ५०
चर्चगेट-दादर        ५०
चर्चगेट-वांद्रे        ९०
चर्चगेट-अंधेरी    ९०
चर्चगेट-बोरिवली    १२०
चर्चगेट-वसई    १४५
चर्चगेट-विरार    १४५
मध्य रेल्वे प्रवासाचे भाडे
(प्रस्तावित भाडेवाढ)

दुसऱ्या वर्गाचे तिकिटाचे दर
स्थानके    किमी अंतर        सध्याचे दर            सुधारित दर
सीएसटी-भायखळा    ५                        ४                         ५
सीएसटी-दादर    ९        ४        ५
सीएसटी-कुर्ला    १६        ९        १०
सीएसटी-ठाणे    ३४        ११        १५
सीएसटी-कल्याण    ५४        १५        २०
सीएसटी-कर्जत    १००        २२        २५
सीएसटी-कसारा    १२१        २५        ३०
सीएसटी-पनवेल    ४९        १७        २०

पश्चिम रेल्वे प्रवासाचे भाडे
(प्रस्तावित भाडेवाढ)
दुसऱ्या वर्गाचे तिकिटाचे दर
स्थानके    किमी    सध्याचे दर    सुधारित दर
चर्चगेट – मुंबई सेंट्रल    ५    ४    ५
चर्चगेट-दादर    ११    ८    १०
चर्चगेट-वांद्रे    १५    ८    १०
चर्चगेट -अंधेरी    २२    १०    १०
चर्चगेट-बोरिवली    ३४    ११    १५
चर्चगेट-विरार    ६०    १६    २०

दुसऱ्या वर्गाचे मासिक पासाचे दर
स्थानके    किमी    सध्याचे दर     सुधारित दर
चर्चगेट – मुंबई सेंट्रल    ५    ७०    ७५
चर्चगेट-दादर    ११    ११५    १२०
चर्चगेट-वांद्रे    १५    ११५    १२०
चर्चगेट -अंधेरी    २२    १४५    १५५
चर्चगेट-बोरिवली    ३४    १६०    १७०
चर्चगेट-विरार    ६०    २५०    २७०

Story img Loader