सोनसाखळी चोरीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या एका आरोपीने अंधेरी पोलीस कोठडीत गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेची घडली गुन्हे शाखा अधिक चौकशी करत आहे.
डी.एन. नगर पोलिसांनी शाम भामळे (२६) नावाच्या आरोपीला सोनसाखळी चोरी प्रकरणी अटक केली होती. सोमवारी अंधेरी येथे प्रिती दुबे या तरुणीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून पळताना स्थानिक लोकांनी त्याला रंगेहाथ पकडले होते.
मंगळवारी त्याला वांद्रे येथील न्यायालयात हजर केले असता त्याला ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्याला अंधेरी पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. मंगळवारी रात्री त्याने कोठडीतच गळफास लावून आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
श्याम एका खासगी कंपनीत पर्यवेक्षकाचे काम करत होता. त्याच्या नावावर कुठल्याही गुन्ह्याची नोंद नव्हती. हे प्रकरण कोठडीतील मृत्यू म्हणून त्याचा तपास गुन्हे शाखा करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त महेश पाटील यांनी दिली. तर पोलिसांच्या मारहाणीत श्यामचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा