मुंबई : क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याच्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेली समाजमाध्यम प्रभावक (सोशल मीडिया इन्फ्लुईन्सर) सपना गिल हिने गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. आपल्याविरोधातील प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) खोटय़ा आरोपांवर आधारित असून आपल्याला या प्रकरणी गोवले जात असल्याचा दावा सपना हिने याचिकेत केला आहे. तिच्यासह चार आरोपींना अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने जामीन दिला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prithvi shaw assault case sapna gill in high court to quash the case ysh