राज्यातील जिल्हा पोलीस अधीक्षकांना विमान प्रवास करण्याची परवानगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याप्रमाणेच जिल्हा पोलीस अधीक्षकांना आता पोलीस महासंचालकाच्या पूर्व परवानगीने विमान प्रवास करता येईल.
जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक हे एकाच दर्जाचे अधिकारी आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही वेगवेगळ्या बैठकांसाठी मुंबई येथे हजर रहावे लागते. त्यांच्यावर कार्यालयीन कामकाजाबरोबरच मुख्यत्वे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी आहे. हे करीत असताना त्यांना कायमस्वरुपी मुख्यालयात हजर रहावे लागते. काही महत्वाच्या बैठकांसाठी त्यांना अपरिहार्यपणे मुख्यालय सोडावे लागल्यास परत तातडीने मुख्यालयात हजर होणेही आवश्यक असते.
पोलीस मुख्यालयात काही दिवसांपूर्वी आयोजित पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत पोलीस अधीक्षकांना विमान प्रवास करण्याबाबत परवानगी देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी यावर वित्त विभागाकडून माहिती घेऊन त्वरित कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले होते. पोलीस महासंचालक यांनी देखील 4 सप्टेंबर 2012 रोजी तसे पत्र गृह विभागास पाठविले होते.
आता पोलीस अधीक्षकांनाही विमान प्रवासाची मुभा
राज्यातील जिल्हा पोलीस अधीक्षकांना विमान प्रवास करण्याची परवानगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
First published on: 16-09-2013 at 03:54 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prithviraj chavan allowed air fair to superintend of police