नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील सोयीसुविधांच्या तक्रारीची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गंभीर दखल घेतली असून ‘आयआरसीटीसी’ची उपहारगृह सेवा बंद करण्यात आली आहे. उपहारगृहासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र खासदारांचे वर्तन योग्य नसून लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी ओळखून वर्तणूक ठेवणे, आवश्यक असल्याची टिप्पणी मुख्यमंत्री चव्हाण यांनी केली आहे.
दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील उपहारगृहात निकृष्ट दर्जाचे भोजन मिळते. इतरही अनेक गैरसुविधा असून निवासी आयुक्त बिपीन मलिक यांनी दखल न घेतल्याने शिवसेना खासदारांनी नुकतेच आंदोलन केले होते. लोकसभेत बुधवारी त्याचे पडसाद उमटले. त्यामुळे मुख्यमंत्री चव्हाण यांनी गेल्या काही दिवसांपासून खासदारांनी केलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे. या तक्रारींची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. दिल्लीतील निवासी आयुक्त बिपीन मलिक यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून त्यांच्याकडून वस्तुस्थितीची माहितीही घेतली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा